मौजा खापा येथे मुलबाळ नसलेल्या दांपत्याला हेरून मुलं विकणारी टोळी सक्रीय 

मौजा खापा येथे मुलबाळ नसलेल्या दांपत्याला हेरून मुलं विकणारी टोळी सक्रीय 

मौजा खापा येथे मुलबाळ नसलेल्या दांपत्याला हेरून मुलं विकणारी टोळी सक्रीय 

✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
📱 8308726855 📱
📞 8799840838 📞

तुमसर : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात मौजा खापा येथे मुलबाळ नसलेल्या दाम्पत्याला हेरून मुलं विकणारी टोळी जिल्ह्यात सक्रीय असल्याची विश्वसनीय माहिती असुन. तुमसर तालुक्यातील खापा हा गाव विक्रीचे केन्द्र बिंदु आहे. अलीकडेच दीड ते दोन महिन्यांच्या मुलांचा लाखात सौदा झाला होता, मात्र काही कारणास्तव हा व्यवहार पुर्ण झाला नाही. मात्र आता या मुलं विकणाऱ्या टोळीची परिसरात चर्चा चालत आहे. खापा या गावात काही दिवसापूर्वी एका दिड ते दोन महिन्यांच्या मुलांच्या विक्रीचा सौदा सुरु होता. मुलगा घेणारे दाम्पत्य हे मात्र गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातिल असल्याची माहिती आहे. संपुर्ण परिवारासह खापा येथे ही मंडळी आली त्या महिलेसोबत बाळा संदर्भात चर्चा केली, त्यावेळी तिने मी यापूर्वी अनेकांना बाळ उपलब्ध करून दिले. तुम्हाला बाळ हवे असेल तर लवकर बोला. नाहीतर दुसरे दांम्पत्य तयार आहे. असे सांगीतले.
याच वेळी या महिलेने समोरच्या व्यक्तीला फोन लावून बाळासाठी आलेली मंडळी आधार कार्ड मागत आहे. परंतु आपण ते देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला दुसरी पार्टी शोधावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर हा व्यवहार पुर्ण झाला नाही. अशा प्रकार तुमसर, मोहाडी तालुक्यात झाल्याची माहीती आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केल्यास मोठी टोळी हाती लागण्याची शक्यता आहे. जेनेकरूण हा मोठा अपराध टाळता येईल. करीता भंडारा जिल्ह्यातील संपुर्ण तालुक्यातील पोलीस ठाणे यांना माहीतीत्सव सादर आहे. या अश्या घोर फसवणूक करणाऱ्या व अपराध करणाऱ्या टोळीस अटक करूण शिक्षा द्यावी अशी विनंती खापा ग्रामवासीयांनी केली आहे.