मोहफुलाचा संकलन ठरलाय रोजगाराचा आधारस्तंभ 

मोहफुलाचा संकलन ठरलाय रोजगाराचा आधारस्तंभ

मोहफुलाचा संकलन ठरलाय रोजगाराचा आधारस्तंभ 

✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
📱 8308726855 📱
📞 8799840838 📞

भंडारा :- आदिवासी रोजगाराच्या दृष्टीने हिरडा, बेहडा, आवळा, याचबरोबर मोहफुलही तितकेच महत्वाची आहे. मोह हे आदिवासी भागातील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधनच जुणू त्यामुळे मोहाला आदिवासी देव मानतात. या मोहफुलाच्या झाडाला काही आदीवासी जमाती व झाडीपट्टीतील लोक देव मानतात. या झाडाखाली त्यांचा देव मांडतात. बहुतेक आदिवासींचे जीवन व त्यांचे सन, धार्मीक कार्यक्रम या झाडाच्या फुलापासुन बनविलेल्या दारु शिवाय [मोहाची दारु ] पुर्ण होत नाही. होळी सन साजरा करून मोहफुल गोळा करण्याला सुरुवात करतात. ती वाळवून, साठवून ठेवतात. रोख पैशांची गरज असेल तेव्हा बाजारात विकतात.
खचाअर्थाने कोणालाही ” मोह पडावा ” व आपला जास्तीत जास्त संकलन व्हावा असे आदिवासी झाडीपट्टीतील संपुर्ण लोकांना वाटतात. सध्या मोहवृक्ष फुलांनी बहरलेले आहेत. या मोह फुलाच्या संकलनातून अभयारण्य तसेच जंगलालगच्या ग्रामीन नागरीकांना हंगामी रोजगार उपलब्ध होत आहे. तथापी मोह फुल हे बहुपयोगी वृक्ष असल्याने त्याला झाडीपट्टीतील कल्पवृक्ष मानले जाते. मोहफुल व बियांपासुन शरबत,जॅम, जेली, तेल असे विविधपुर्ण पदार्थ तयार केले जातात, परंतु केवळ हातभट्टीच्या दारुमुळे मोह फुलाकडे उपेक्षी दृष्टीने बघितले जाते.
जिल्ह्यात विपुल प्रमाणात मोहवृक्ष आहेत. दरवर्षी कोट्यावधींची उलाढाल मोहफुल संकलनातून होते. दरवर्षी मार्च महिन्यात ते बहरतात. एका झाडापासुन जवळपास ५० किलो मोहफुल मिळतात. हि फुले साधारणतः २० ते २५ रुपये प्रती किलो दराने विकली जातात, एकट्या भंडारा जिल्ह्यात या झाडापासुन १०० टन प्रतिकिलोने
हिशोब केल्यास हा जातो. इतक्या प्रचंड प्रमाणात फुलांचे उत्पादन होते. २५ रुपये आकडा कोट्यावधींचा घरात मोहफुलांचे उत्पादन होत असले तरी पुर्व विदर्भात त्यावर आधारीत एकही प्रक्रिया उद्योग नाही. राज्यात ऊस, द्राक्षांपासुन दारु तयार केली जाते, त्या दारुला शासनाची मान्यता आहे. परंतु हिच दारू मोह फुलापासुन तयार केली तर त्याला शासनाकडून मान्यता मिळत नाही. हा विरोधाभास आहे ग्रामिण भागात मोह फुलापासुन दारू निर्मीती व विक्री केली जाते. मान्यता व महसुल मिळत नसल्याने शासनाच्या लेखी ती अवैध असली तरी त्यातुन हजारो लोकांचा प्रपंच चालतो हे तितकेच कटू वास्तव आहे.
मोहफुल मार्च महिण्यात येतात मोहापासून साबण आणि तेल देवाधर्मात औशधात मोहफुलाचा फार उपयोग होतो. मोहाचे फुल पौष्टिक आहे. म्हणून ते गरोदर बाईला, आजारी मानसाला ते खायला देतात. मोहाने पोर भरते मोह पथ्यावर चालते. कारण मोह गरम आहे. उदरनिर्वाहाचे साधन मोहाने खोकला होत नाही. मोहफुलाचे फळ एप्रिल ते जुलै या कालावधीत फळे परिपक्व गळून पडतात. या फळाला ग्रामीण भागात दोडा म्हणुन संबोधले जातात. हि फळे परिपक्व झाल्यानंतर माणसे, जनावर जनावरे, शेळ्या मेंढ्या, माकडे, पोपट खातात या फळातील बिया गोळा करण्यासाठी लोक भल्या सकाळी जातात. या बिया गोळा करने हा एक उदरनिर्वाहाचा साधन आहे. हे मद्यार्क काही औशधा मध्ये वापरतात. याचा इंधन म्हणून वापर करण्यावर शंसोधन चालु आहे, अधिकृत करा व्यवसायावर सरकारला दारुच्या विक्रीतून सर्वाधिक महसुल मिळतो. त्यामुळे सरकारने वॉईन शॉप सुरु करण्यास परवानगी दिली होती. मोहाच्या फुलापासुन दारु काढली जाते. हा व्यवसाय अधिकृत नाही. आदिवासींना या व्यवसायातून चार पैसे मिळतात. सरकारने एकतर उद्योगाला परवानगी द्यावी किवा जी मोहाची फुले आहेत त्याची खरेदी करावी आणी त्यातुन दारु तयार करावी. त्यामुळे आदिवासींनाही रोजगार मिळेल व सरकारलाही टॅक्स मिळेल.