रेती तस्करांकडून निडरपणे रेतीची खुलेआम चोरी सुरू प्रशासनाची कार्यवाया थंडावल्या

रेती तस्करांकडून निडरपणे रेतीची खुलेआम चोरी सुरू

प्रशासनाची कार्यवाया थंडावल्या

रेती तस्करांकडून निडरपणे रेतीची खुलेआम चोरी सुरू प्रशासनाची कार्यवाया थंडावल्या

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी : तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव झाले परंतु उचल करण्यासंदर्भात कुठलाच आदेश पारित करण्यात आला नाही.सोबतच लिलाव करण्यात आलेल्या रेटिघाटावर उत्खनन करावयाच्या भागांचे मोजमाप करणे गरजेचे आहे मात्र त्या ठिकाणी तसे दिसुन आले नाही. मोजमाप कारवयाचे असतानाच रेती व्यवसायिक नदीपात्रातून सोयीस्कर असणाऱ्या कोणत्याही भागातून उत्खनन करण्याचा सपाटा सुरू केला आहे.
घाटावर पोकलेंन आणि जेसीबीच्या मदतीने खनिज कर्म विभागाचे नियम पायदळी तुडवून रेतीची सर्रास उचल सुरू आहे.घाटावर सीसीटीव्ही लावणे नियमात नमूद आहे परंतु ते लावण्यात आले नाही.त्यामुळे अतिशय नियमबाह्य पद्धतीने घाटावरून रेतीची उचल सुरू आहे.दरम्यान तालुक्यात विविध विकास कामाचे नुकतेच भूमिपूजन पार पडले,त्यामुळे काही शासकीय तसेच बिगर शासकीय बांधकाम सुरू झाले त्या ठिकाणी रेती पुरवली जात आहे.ती वैध की अवैध हे मात्र समजण्यापलीकडे आहे.नेमकी रेती येतेय तरी कुठून..?असा सवाल उपस्थित होत आहे.जिथे-जिथे बांधकाम सुरु आहे तिथे-तिथे रेतीचे ढिगारे दिसून येत आहे.याचाच अर्थ रेती तस्करांकडून रातोरात रेतीची तस्करी होत असल्याचे समजते.
तहसिलदार के.डी.मेश्राम व मंडळ अधिकारी सुर्वे यांनी रेती तस्करांवर कार्यवाहीचा बडगा उगारला असला तरी लिलाव करण्यात आलेल्या रेती घाटावरील पोकलेंन व जेसीबी वाहनांवर कारवाई का करीत नाही पाहणी करून रिकाम्या हाताने माघारी येत असतात त्यामुळे मोठे मासे गराला न लावता लहान मासे फासल्या जात असल्याचे दिसून येत आहे.लिलाव घेणाऱ्या रेती व्यवसायिकांकडून संबंधित विभागाचे अधिकारी चांगलेच खिसे गरम करत असल्याची चर्चा तालुक्यात आहे.रेती घाटावरून रेतीचा उपसा करत असताना आढळलेले पोकलेंन व जे.सी.बी.हायवा,ट्रक वर कारवाई न करता अन्य घाटावरून रेती तस्करी करणाऱ्या ट्रक्टर जप्त करून लाखोंचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करीत असल्याचा तुरा मिरवीत असणारे अधिकारि मोठे वाहनांवर कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे.
अधिक माहितीनुसार तालुक्यात रेती तस्करांची मोठी टोळी निर्माण झाली आहे.त्यात तालुक्यातील मोठ-मोठी व्यक्ती सामील आहेत.काही निडर आणि कायद्याला केराची टोपली समजणारे असल्याने,रात्रौ मोठया प्रमाणात लिखितवाडा, सोमनपली,धाबा,पानोरा,कुलथा, शिवानी ,राळापेठ ,येनबोथला इत्यादी घाटातून रेतीची खुलेआम आणि सर्रास चोरी होत करत आहेत.हि टोळी आधी नियोजित ठिकाणी रेतीची डम्पिंग करतात, त्या नंतर रेतीची विल्हेवाट लावतात.अश्या प्रकारे बेकायदेशीर रित्या रेतीची चोरी होत असल्याने शहरात ठिकठिकाणी रेतीचे ढिगारे दिसून येत आहे.परिणामी प्रशासनाने वेळीच लिलाव केलेल्या रेती घाटाचे उचल करण्या संदर्भात निर्णय घेऊन महसूल गोळा करावा अशी मागणी होत आहे.
दोन घाटाचे लिलाव झाले पण आदेश केव्हा होणार..? तालुक्यांतील लिलाव झालेल्या रेती घाटांचे लवकरच आदेश झाल्यास शासनाला या मार्फत लखो रुपयांचा महसूल मिळू शकतो.आदेशाची प्रक्रिया लांबत असल्याने रेती घाटामधून रेतीच्या तस्करीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.तस्कर विविध शक्कल लढवून रेतीचे खनन करित लाखोंची कमाई करत आहेत. यावर आळा घालण्याची नितांत गरज आहे.

बॉक्स:

तालुक्यातील एका राजकीय पदाधिकारी व रेती तस्कर यांच्यात वसुलीचे ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने विविध शंकांना उत आला आहे.असे किती तरी मोठी व्यक्ती वसुलीच्या धंद्यात उतरून आपले खिसे गरम करत असल्याची चर्चा रंगत आहे.