सोन्द्री येथील गोपालचा मृत्यू की हत्या..? माझ्या मुलाचा खून झाला…!मृतकाच्या आईचा पत्रकार परिषदेत आरोप

सोन्द्री येथील गोपालचा मृत्यू की हत्या..?

माझ्या मुलाचा खून झाला…!मृतकाच्या आईचा पत्रकार परिषदेत आरोप

सोन्द्री येथील गोपालचा मृत्यू की हत्या..? माझ्या मुलाचा खून झाला...!मृतकाच्या आईचा पत्रकार परिषदेत आरोप

क्रिष्णा वैद्य✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी/विशेष
9545462500

ब्रह्मपुरी: तालुक्यातील सोंदरी येथील गोपाल राजीराम पारधी वय (२३) या युवकाचा १२ मार्चला संशयास्पद स्थितीमध्ये गावाजवळील कोरड्या नहरालगत मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती. ११ मार्चला गावातील पाच ते सहा लोक गोपालच्या घरी येवून गोपालच्या आईजवळ गोपालला जीवे मारण्याची धमकी देतं निघून गेले व दुसऱ्याचं दिवशी दि.१२ मार्च रोजी सकाळी गोपालचा मृतदेह नहरात संशयितरित्या आढळून आला.

घटनास्थळी आढळून आलेल्या चपला मुतकाच्या नसून मारेकऱ्याच्या आहेत.मृतकाच्या शरीरावर जखमा असतांनाही ब्रह्मपुरी पोलिसांकडून घटनेचा पंचनामा व थातूर मातूर तपास करून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. माझ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तोंडी रीपोट पोलिसांना दिली असताना अद्याप त्याची चौकशी करण्यात आली नाही तर गोपाल ला धमकी देणाऱ्या युवकाचा दुसऱ्या दिवशी, तुझा साळा मृतावस्थेत असल्याची माहिती फोनवरून मृतकाच्या जावई याला देण्यात आली. गावातील धमकी देणाऱ्या नागरिकांनी माझ्या मुलाला ठार मारले असल्याचा आरोप मृतक गोपालची आई यमुनाबाई राजीराम पारधी व मृकाचा जावई यांनी दिनांक १९ मार्च २०२२रोजी सोन्द्री येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला असून सदर घटनेची सखोल चौकशी करावी व मला योग्य न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली.यावेळी पत्रकार परिषदेला सुनंदा पारधी , सोंदरीचे सरपंच केवळराम पारधी, विष्णू आंबोने, कुंदा कमाने यांची उपस्थिती होती.