मौजा आजनी येथे आजपासुन बैलांची ऐतिहासिक शंकरपट सुरु

मौजा आजनी येथे आजपासुन बैलांची ऐतिहासिक शंकरपट सुरु

मौजा आजनी येथे आजपासुन बैलांची ऐतिहासिक शंकरपट सुरु

✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
!! मिडीया वार्ता न्युज !!
📱 8308726855 📱
📞 8799840838 📞

रामटेक :- नागपूर जिल्हा रामटेक तालुक्यातील मौजा आजनी येथे सोमवार दिनांक २१ मार्च २०२२ ते शनिवार दिनांक २६ मार्च २०२२ ला पाच दिवशीय बैलांची भव्य ऐतिहासिक शंकरपटाचे आयोजन केले आहे.
मागील अनेक दिवसांपासून बैलगाडा शर्यतीला बंदी होती. आता न्यायालयाने अशा शर्यतींवरील बंदी उठवली आहे. सध्या राज्यान ठिकठिकानी बैलगाडा शर्यती मोठ्या थाटामाटात भरवल्या जात आहेत. पण ही ३०० वर्षाची परंपरा असलेली विदर्भातील पारंपारिक स्पर्धा म्हणजे शंकरपट. बैल जोडीची शर्यत म्हणजे शंकरपट. या खेळामध्ये काही भागात एका वेळेस एक गाडी किंवा काही भागात दोन बैलगाड्या सहभागी असतात. यामध्ये गाडीवर बसलेला चालक हा गाडी चालवत असतो. अंतीम सीमारेषेजवळ पंच कमेटी बसलेली असते. जि बैलजोडी सर्वात कमी वेळेत ४५० फुट अंतर पार पाडेल, त्यांना प्रथम क्रमांक दिला जातो. ही स्पर्धा सेकंदावर चालते. विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील बरेचशे शेतकरी या खेळासाठी आपली बैलजोडी मोठ्या उत्साहात तयार करत असतात. हंगामातील वार्षीक यात्रांना शंकरपट ही स्पर्धा भरवली जात होती. पश्चिम महाराष्ट्रातील खेळला जानारा छकडी शर्यत आणि शंकरपट मधील गाडी मध्ये गुफच फरक आहे. दोन्हीही शर्यतीच्या प्रकारामध्ये शर्यतीमध्ये गाडीवर मानुस बसलेला असतो आणि
बैलांना चालवत असतो. छकडी शर्यतीमध्ये चालक हा गुडघ्यावर तोल सांभाळून गाडीमध्ये बसत असतो. पण शंकरपटामध्ये चालकाला बसायला वेगळी जागा असते. जसे की दोन चाकांना जोडणारा जो “आक ” ( दोन चाकाला जोडणारा मधला लोखंडी रॉड ) असतो . व्यावर बसण्यासाठी चालकाला खास व्यवस्था असते.
तरीपण या पाच दिवशीय भव्य ऐतिहासिक शंकरपटाचे उद्‌घाटन दिनांक २१ मार्च २०२२ रोज सोमवारला सकाळी ११:०० वाजता करण्याचे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.
यात कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. सुनिलजी केदार ( दुग्ध विकास मंत्री महाराष्ट्र राज्य) उद्‌घाटक मा.श्री. कृपालजी तुमाने ( खासदार लोकसभा क्षेत्र रामटेक) सहउद्‌घाटक मा. श्री. प्रकाशजी जाधव ( माझी खासदार लोकसभा क्षेत्र रामटेक ) मा. श्री. आशिषजी जायस्वाल ( आमदार विधानसभा क्षेत्र रामटेक) मा. श्री. राजेन्द्रजी मुळक ( माझी राज्यमंत्री ) मा. सौ. लक्ष्मी बर्वे ( अध्यक्षा जि. प. नागपूर ) प्रमुख अतिथी मा. श्री. दुधरामजी सव्वालाखे ( जि.प. सदस्य नागपूर ) मा. श्री. उदयसिंग उर्फ गज्जु यादव ( माझी उपसभापती प. स. रामटेक ) मा. श्री. कैलासजी बरबटे ( जि.प. सदस्य नागपूर ) मा. डॉ. रामसिंगजी शहारे ( सामाजिक कार्यकर्ता ) मा श्रो तापेश्वरजी वैदय ( सभापती कृषी व पशु संवर्धन जि.प. सदस्य नागपूर ) सौ. अश्विता बिरनवार ( सदस्या प. स. रामटेक ) सौ. सुषमा बिरनवार ( सरपंच आजनी श्री. जितेन्द्र गराडे ( उपसरपंच आजनी ) श्री. नरेशजी धोपटे ( माझी जि.प. सदस्य नागपूर ) सौ. सुमनताई बशिने ( माझी सरपंच आजनी ) श्री. स्वप्नील विजय भनारे ( सामाजिक कार्यकर्ता ) श्री. शंकरजी होलगीरे ( माझी प.स. सदस्य रामटेक ) व समस्त आजनी ग्रामवासी व आयोजक मंडळ.
या शंकरपटाचे प्रथम बक्षिस एल ई डी टिव्ही. द्वीतीय बक्षीस आलमारी, तृतीय बक्षिस कुलर, चतुर्थ बक्षिस फवारणी डस्टर, व पंचम बक्षिस झुली जोड देण्यात येईल.
मंडळाचे नियम:- १) पट दोन दानीची राहील. २) सुप्रिम कोर्टाने निर्धारीत केलेल्या अटी व शर्तीचा अधिनीस्त राहुन शंकरपट भरवण्यात येईल. ३) जोडी सिग्नल पडल्याशिवाय विजय घोषीत होणार नाही. ४) झंडी मास्टरने झंडी दिल्या शिवाय जोडी सोडता येणार नाही. ५) पटाचे सर्व नियम पट पंच कमेटी राखीव ठेवणार. ६) दंगा फिसाद करणाऱ्याला पोलीसांचे स्वाधीन करण्यात येईल.
या ऐतिहासिक शंकर पटामध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हाल अशि घोषना व आव्हाहन आयोजक मंडळी यांनी केली आहे.
आयोजक मंडळ :-
अध्यक्ष श्री. रंगलालजी नागपूरे, उपाध्यक्ष श्री. मदनजी बरबटे, सचिव श्री. शंकरजी होलगीरे, सहसचिव नारायणजी नागपूरे, कोशाध्यक्ष प्रसांतजी कामडी. यांनी पट रशिक बंधवांना संपूर्ण नियमाचे पालन करण्याची घोषना केली आहे. व बैलांची शंकरपट शांतरीत्या पार पाडण्यात शहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.