संपादक सावंत सरांकडून माननीय राहुलभाई सोळंकी यांना मीडियावार्ता साप्ताहिक तसेच मीडियावार्ताचा वार्षिक अंक प्रदान

सिद्धांत
२२ मार्च, मुंबई: बहुजन क्रांती पॅन्थरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि शिवराज्य सफाई कर्मचारी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष पॅन्थर राहुलभाई सोळंकी यांची मीडियावार्ता साप्ताहिकाचे संपादक श्री. भागूराम सावंत यांनी मुंबई येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान मीडिया वार्ताचे रायगड जिल्हा प्रतिनिधी जितू भाई पवार उपस्थिती होते. यावेळी संपादक सावंत सरांकडून माननीय राहुलभाई सोळंकी यांना मीडियावार्ता साप्ताहिक तसेच मीडियावार्ताचा वार्षिक अंक प्रदान करण्यात आला.
बहुजन क्रांती पॅन्थरचे राहुलभाई सोळंकी हे सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी निडरपणे प्रशासनाला जाब विहारात असतात. अलीकडेच विक्रोळी पार्कसाईट पोलीस स्टेशन मधील पाच पोलीस कर्मचारी आणि एक महिला पोलीस कर्मचारी यांनी दोन सामान्य महिलांना मारहाण केली होती. याप्रकरणी पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी राहुलभाई सोळंकी यांनी मंत्रालयासमोर आंदोलन करून त्या महिलांचा आवाज प्रशासनासमोर मांडला होता. अन्यायाविरुद्ध समाजबांधवाच्या लढ्यामध्ये ते नेहमीच तत्परतेने पुढाकार घेत असतात.
हे आपण वाचलंत का?
- समाजाच्या प्रगतीची केंद्र बनलेल्या आदर्श बुद्धविहारांचा “शोध आदर्श बुद्धविहारांचा” या मीडियावार्ताच्या उपक्रमाद्वारे होणार सन्मान
- राज्यातील तरुणांसाठी खुशखबर, लवकरच पोलीस दलातील ७ हजार २३१ पदांची होणार भरती
- शोध आदर्श बुद्धविहारांचा…चळवळीच्या केंद्रांचा
२० मार्चला महाड चवदार तळे सत्याग्रह कार्यक्रमाच्या दिवशी मीडिया वार्ताच्या मुंबई टीमला माननीय राहुलभाई सोळंकी आणि रायगड जिल्हा प्रतिनिधी जितू भाई पवार यांनी मोलाचे सहकार्य केले होते. यावेळी माननीय राहुलभाई सोळंकी यांनी मीडिया वार्ता साप्ताहिकाचे “सर्व सामान्य नागरिकांच्या न्यायासाठी लढणारा एकमेव मराठी साप्ताहिक” अशा शब्दात स्तुती करून जनतेला मीडिया वार्ताशी जुडण्याचे आवाहन केले.
https://www.instagram.com/p/CbGE28qtDCl/