दापोरी येथील गावातील प्रश्नावर छत्रपती शिवाजी मैत्री संस्था मोर्शी सा. बा. विभाग कार्यालयावर सरळ…!
✍ हर्षल पाटील ✍
मोर्शी तालुका प्रतिनिधी
📱 8600650598 📱
मोर्शी ( दापोरी ) – मोर्शी वरून जवडच असलेल्या दापोरी येथील गावातून जाणारा प्रमुख रस्ता वरील दोन्ही बाजूने असलेली नाली बांधकाम अपूर्ण अवस्थेत.*
💥 *संस्थेतील युवकवर्ग व ग्रामस्थांची गतिरोधक बसविण्याची मागणी*
💥 *सा. बा. वी. मोर्शी ने दिलेल्या ठेकेदारांचा मनमौजी कारभार चालू*
💥 *ग्रामस्थांनी फेऱ्या मारून ही अडचणींच्या प्रश्नावर दुर्लक्ष*
रस्त्याचे पूर्णतः काम हे समाप्तिवर आहे मात्र दापोरी येथील महत्त्वाचा असालेला रस्ता च्या दुसऱ्या बाजूचे नाली बांधकाम हे निष्काळजी पने अपूर्ण आहे त्याच बाजूने गावातील मुख्य असलेले संत लालदास स्वामी विद्यालय, श्री.गुरुदेव सेवा मंडळ प्रार्थना मंदिर, जिल्हा परिषद शाळा व काही घरे ,शेती आहे या अलघर्जी पना व काम न करण्याची वृत्ती असलेल्या अधिकाऱ्यांचा कृत्याचा फटका व त्रास गावातील विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना होणार आहे
पावसाळ्यात येणारा पूर्ण पाणी रस्ता उंच असल्याने व नाली बांधकाम नसल्याने महाविद्यालयात ,शाळेत, मंदिरात व शेतात थेट शिरणार आहे
व या प्रकारावर सामाजिक बांधकाम विभाग यांचे दुर्लक्ष आहे , सोबतच शाळा, महाविद्यालय अशा ठिकाणी छोट छोट्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता गतिरोधक बसवणे प्रमुख ठिकाणी गरजेचे आहे ,
प्रत्येक वेळी ग्रामस्थांनी कार्यालयात जाऊन निवेदन दिली मात्र उडवा उडवी ची उत्तरे व निवेदन घेऊन विषय थांबला
मात्र कामाला सुरुवात कधी असा प्रश्न संस्थे मार्फत विचारण्यात आला. अशा आशयाचे निवेदन संस्थे चे अध्यक्ष श्रणित दि. राऊत देण्यात आले.
येत्या आठ ते दहा दिवसांत कामाला सुरुवात न झाल्यास छत्रपती शिवाजी मैत्री संस्थेतर्फे युवक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सा. बा. विभाग कार्यालय येथे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला प्रसंगी संस्थे चे विजुभाऊ सिरसाम( ग्रा. स) रोशन भाऊ विघे, शेखरभाऊ विघे,स्वप्नील भाऊ ढोमने, पवन कडू, आचालं कोल्हेकार, धीरज विघे, प्रशांत राऊत, अमोलभाऊ विघे, गोपाल ठाकरे मित्रमंडळी उपस्थित होते.