पक्षीमित्रातर्फे पक्ष्यांसाठी मातीचे जलपात्र वाटप.

पक्षीमित्रातर्फे पक्ष्यांसाठी मातीचे जलपात्र वाटप.

पक्षीमित्रातर्फे पक्ष्यांसाठी मातीचे जलपात्र वाटप.

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभीड.: जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधुन रविवार दिनांक 20 मार्च रोजी येथील सर्वतोपरिचीत पक्षीमित्र व महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे आजिवन सभासद श्री राजेंन्द्र भाजे यांनी उन्हाळ्यात घरोघरी पक्ष्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून रेल्वे परिसरातील माॅर्नींग वाॅक संघटनेच्या सदश्यांना व शिक्षकवृंदांना विनामुल्य मातीचे *जलपाञ* वितरित केले.

प्रसंगानुरुप त्यांनी उपस्थितांना सदर चिमणी दिनाचे महत्व सांगुन पक्ष्यांचे मानवी जीवनातील महत्व विषद करुन सांगीतले, त्या वेळी येथील नगरसेवक व बांधकाम सभापती श्री सचीनजी आकुलवार यांनी लागोलाग पक्षीमित्र श्री भाजे यांच्या या उपक्रमाचे मनस्वी कौतूक केले आणी पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला.

या कार्यक्रमास पं. कृ. विद्यापिठ पुरस्कृत प्रगतीशील शेतकरी व स्वत: पक्षीप्रेमी असलेले श्री अरुनभाऊ नरुले , तसेच सर्वश्री दिलीपजी भानारकर साहेब, संजय पातेवार सर, सुशील कामडी सर, रमेश घुटके सर, सुधाकर सर, देशमुख सर, प्रशांत सर, नान्हे सर, रामदासजी बहेकर, विजय संदोकर, सौ. शारदा कारेमोरे, अन्नाजी चायवाले हे आवर्जुन उपस्थित होते.