मुंबई विद्यापीठात साजरी होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे यश

72

मुंबई विद्यापीठात उभे राहणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर

मीडिया वार्ता न्युज
२४ मार्च, मुंबई: मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल रिसर्च सेंटर उभारण्याचे महाराष्ट्र शासनाकडून घोषित करण्यात आले होते. या वास्तूसाठी मुंबई विद्यापीठातील ६ एकरची जागा ह्या राखीव ठेवण्यात आली. या जागेवर येति डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेकडून करण्यात आली होती. ह्या मागणीला मुंबई विद्यापीठाकडून मान्यता मिळाली असून, त्याची माहिती स्वतः सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी वृत्त माध्यमांना दिली.

यावेळी ते म्हणाले कि, रिपब्लिक सेनेने जी आंदोलन केली ती सर्व यशस्वी केली. इंदू मिल, पीपल एजुकेशन सोसायटीची अंदोलन आपण यशस्वी केली. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून रिपब्लिकन सेना आणि विशेषतः रिपब्लिकन विद्यार्थी सेनेकडून मुंबई विद्यापीठामध्ये डॉ, बाबासाहेब आंबेडकर जागतिक रिसर्च सेन्टर उभे करण्यात यावे यासाठी आंदोलन करण्यात येत होते. महाराष्ट्र शासनाकडून ह्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या रिसर्च सेंटरच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यासाठी रिपब्लिकन सेना आणि रिपब्लिकन विद्यार्थी सेनेकडून मागणी करण्यात आली होती. परवानगी न दिल्यास या विरोधात आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांनी जयंतीला परवानगी दिल्याने होणारे आंदोलन स्थगित केले आहे.

https://youtu.be/I0cpSrmTMok

यापुढे बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले कि, जर महाराष्ट्र प्रशासन आणि मुंबई विद्यापीठाने आपला दिलेला शब्द मागे घेऊन कार्यक्रमासाठी टाळाटाळ केल्यास, हे आंदोलन पुनर्जीवित करून प्रशासनाविरुद्ध अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल.

हे आपण वाचलंत का?

 

आंदोलन केल्याशिवायच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला परवानगी दिल्यामुळे रिपब्लिकन सेना आणि रिपब्लिकन विदयार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

https://www.instagram.com/p/CbGE28qtDCl/