भारतीय बौद्ध महासभा चे शाखा राजुरा सोमनाथ पूर वॉर्ड राजुरा ठिकानी धम्म उपासिका प्रशिक्षण शिबीरा ला सुरुवात…..
सौ हनिशा दुधे
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
97642 68694
बल्लारपूर : -भारतीय बोैद्ध महासभा ,चंद्रपूर जिल्हा च्या अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा शाखा,राजूराच्या वतीने दि 20 मार्च ते 29 मार्च 2022 पर्यंत सुरू असलेले “दहा दिवसीय धम्म उपासिका प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन ” सम्यक बुद्धविहार”सोमनाथ पूर वॉर्ड राजुरा येथे करण्यात आले.सुरुवातीला बुद्ध वंदना , स्वागत गीत, घेण्यात आली.शिबीराचे उदघाटक आद.इंजि.नेताजी भरणेसाहेब,जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा हे होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष,आद. धर्मु जी नगराळे राजूरा शाखा मार्गदर्शक आद.समता लभाने तर होते.प्रमुख अतिथी म्हणून आद.किशोर तेलतुंबडे, सरचिटणस, गौतम चौरे .सपना कुंभारे . कविता अलोने ,संदीप सोनोने , प्रफुल भगत, गुलाब दरेकर, पौर्णिमा ब्राम्हने वरील पाहुण्याचे स्वागत करण्यात आले आणि सर्वांनी शिबीरास मार्गदर्शन केले.
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा च्या माध्यमातून संपूर्ण भारतभर विद्यान वादी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केल्या जातो.या करिता 24 प्रकारचे शिबीर चे शिबिरे घेऊन बौद्ध धम्माच्या संस्कार चे प्रशिक्षण दिले जाते.महिला करीत धम्म उपसिका प्रशिक्षण शिबीर फार महत्वाचे बामनवाला या शिबिरास प्रचंड प्रतिसाद असल्यामुळे आनंद व्यक्त करण्यात आला. या शिबिरात महिला व पुरुषांची उल्लेखनिय उपस्थिती होती.उदघाटन कार्यक्रमाचे संचालन आयु.नी. मेघा बोरकर आणि आभार प्रदर्शन आयु.नी. गिरजा बाई जगताप यांनी केले.शेवटी भारतीय बोैद्ध महासभेच्या नियमानुसार सरणत्त्य घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. वरील शिबिरे यशस्वी करण्याकरिता राजूरा वैशाली बौध्द महिला मंडळ राजुरा सर्वच पदाधिकाऱ्री अथक परिश्रम घेत आहेत.पुन्हा असेच शिबीरे सोमनाथ पूर वॉर्ड राजुरा व राजुरा तालुक्यात राबविण्यात येतील असे आश्वासन आद. धर्मु नगराळे तालुका अध्यक्ष यांनी दिले.जयभीम