डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे उद्घाटन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे उद्घाटन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे उद्घाटन

क्रिष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी/विशेष
9545462500

चंद्रपूर : -गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था चांदा द्वारा संचालित डॉ बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 24 मार्च ते 30 मार्च 2022 या कालावधीत व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन नुकतेच पार पडले. डॉ.शैलेंद्र देव, संचालक विद्यार्थी विकास विभाग यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.स्निग्धा कांबळे, मानसोपचारतज्ञ डॉ. शशिकांत बांबोळे, कार्यक्रमाचे संयोजक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.तुफान अवताडे विचारमंचावर उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांनी व्यक्तिमत्व विकास विषयक मानसशास्त्रातील अनेक सिद्धांतांचा उल्लेख करून त्यांची उपयोगिता विषद केली.

डॉ.शैलेंद्र देव यांनी आपल्या उद्घाटनपर भाष्यात व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय हे स्पष्ट करून विकसित व्यक्तिमत्वाचे इतिहासातील अनेक दाखले दिले. प्रमुख उपस्थिती लाभलेले मानसोपचारतज्ञ, डॉ. शशिकांत बांबोळे यांनी व्यक्तिमत्व विकास या संकल्पनेची सैद्धांतिक आणि सुसुत्रपने मांडणी करून विचार, भावना आणि वर्तन यांना संतुलित ठेवणे म्हणजेच व्यक्तिमत्व विकास होय असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाची सुरुवात गोंडवाना विद्यापीठ गीताने तर सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांनी डॉ.शैलेंद्र देव तथा डॉ. शशिकांत बांबोळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.

कार्यक्रमाचे संचालन प्रा.तुफान अवताडे तर आभार प्रा. डॉ.स्निग्धा कांबळे यांनी मानले. महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here