मौजा गोबरवाही येथील प्रथम आरोग्य केंद्रात चपराशीला अमानुसपणे केली मारहाण ” डॉक्टर आहे की मानुस अशा प्रश्न निर्माण…..?
✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
!! मीडिया वार्ता न्युज !!
8308726855,8799840838
तुमसर :- भंडारा जिल्हा तुमसर तालुक्यातील मौजा गोबरवाही येथे प्रथम आरोग्य केंद्रात ड़ॉ. कड़स्कार शाहेब ( मोठे इंचार्ज ) यांनी अमानुस पने चपराशी यांना मारहान केल्याची घटना प्रथम आरोग्य केंद्रात घडली आहे. गोबरवाही आरोग्य केंद्राचे चपराशी नामे नारायण उईके असुन गरिब परिवारातील सदस्य आहेत.
आरोग्य किंद्राचे मोठे इंचार्ज नामे डॉक्टर कड़स्कार हे आरोग्य केंन्द्रात दारू पिऊन आले व त्यांनी चपराशी नारायण उईके याला बोलावीले व कोणतेही विचारपुश न करता त्याला लाता, बुक्या, छोटी काठीने बेदम अमानुश पणे मारहान केली. त्या मारहानाची व्हिडीओ क्लीप वायरल झाली आहे. डॉक्टर यांनी एका चपराशीला कशी काय मारहान केली याचा कारण अद्यापही स्पष्ट झाले नसुन हा डॉक्टर आहे की हैवान आहे अशा प्रश्न आदिवासी संघटना व गावकरी जनतेश पडला आहे. या डॉकरांवर अद्याप कोणतीही कार्यवाही का झाली नाही अशा प्रश्न जणतेने केला आहे. आदिवासी संघटना हे डॉक्टर कड़स्कार यांच्या विरोधात एकत्र झाल्याचे दिसुन आले आहे. या मारहाणीचा व्हिडीओमध्ये डॉक्टर हा सर्रास चपराशी नारायण उईके याला लाता, काठी, बुक्याने, व थापडाने मारून त्याची गच्ची पकडुन त्याला जमीनीवर पाडुन मारहान करीत आहे. असे स्पष्ट दिसत आहे.
डॉ. कड़स्कार यांच्या अंगात हैवानीयत का शीरली ? त्याने कशावरूण मारहान केली ? याच नेमक कारण काय ? हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.
आदिवासी संघटना हे डॉक्टर यांच्या विरोधातअसुन त्यांनी योग्य चौकसी करण्यात यावी व दोशीवर गुन्हा दाखल करूण अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. व पिडीत चपराशी यांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.