मा.जिल्हाधिकारी गडचिरोली मार्फत मा. पंतप्रधान भारत सरकार नव्वी दिल्ली यांना निवेदन
*नंदलाल एस. कन्नाके*
*गडचिरोली जिल्हा विशेष प्रतिनिधी*
*मिडिया वार्ता न्युज गडचिरोली*
*मो.नं. 7743989806*
*गडचिरोली* -: आज दि.२४/०३/२०२२ रोजी गुरूवारला मा.जिल्हाधिकारी गडचिरोली मार्फत मा. पंतप्रधान भारत सरकार नव्वी दिल्ली यांना चंद्रभान पराते अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर हे अधिकारी खरे आदिवासी नसतांना खर्या आदिवासींचे प्रमाणपत्र देऊन खर्या आदिवासींवर अन्याय केला तसा सुप्रीम कोर्टाचा निर्णय १०/१०/२०२१ रोजी चंद्रभान पराते अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे विरोधात निकाल लागला त्या अधिकार्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. खर्या आदिवासींच्या शासकीय नौकर्या गैरआदिवासी व प्रकल्प विभागाला लुटणाऱ्या प्रकल्प अधिकारी व बोगस सर्टिफिकेट देणार्या वॅलीडीटी अधिकारी यांची सीबीआय व ईडी कडून चौकशी करून यांची संपत्ती जप्त करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद जिल्हा गडचिरोलीच्या वतीने निवेदन देण्यात आले.