जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल जि रायगड आयोजित शाळापूर्व तयारी अभियान

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल जि रायगड आयोजित शाळापूर्व तयारी अभियान

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल जि रायगड आयोजित शाळापूर्व तयारी अभियान

*सचिन पवार माणगांव रायगड ८०८००९२३०१*

माणगांव : -महाराष्ट्र राज्य शासन शैक्षणिक सशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल “स्टार्स” अंतर्गत पंचायत समिती शिक्षण विभाग तालुका माणगांव दि २१ मार्च ते २२ मार्च २०२२ रोजी शाळांपूर्व तयारी अभियान तालुकास्तर प्रशिक्षण घेण्यात आले. सण २०१९ पासून कोविड १९ या महामारीचा सर्वच घटकावर परिणाम झाला असून लहान मुलांना ही यामुळे बदिस्त करून टाकले त्याचा परिणाम मुलाच्या शिक्षणावर झालेला आहे काही मुळे येत्या जून महिन्यात इयत्ता पहिली च्या वर्गात दाखल होतील परंतु त्यांना अंगणवाडी किंवा बालवाडी वर्गाचा अनुभव घेता येणार नाही यासाठी मार्च, मे, जून मध्ये शाळा पूर्व तयारी अभिमान महाराष्ट्रभर चालवायचे आहे. यासाठी माणगांव तालुक्यातील सुधाकर नारायण शिपूरकर इंग्लिश मेडीयम स्कूल या शाळेमध्ये गट शिक्षण अधिकारी सौ सुनीता खरात गट्समन्व्यक अधिकारी कुमार खामकर, विषय साधन व्यक्ती बेडूगडे सर व सर्व शालेय केंद्रप्रमुख मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक याच्या माध्यमातून मुलांसाठी आनंद घेणे देणे, जिद्द, सहकार्य, नवीन शिकवायला आवडणे, सकारत्मक विचार करणे, मदत करणे, गप्पा मारणे, मुलांनमध्ये रमने अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले तत्पूर्वी या कार्यक्रमाची प्रभात फेरी लेझीम नृत्य घोषणा मेळावा उदघाटन दीपप्रज्वलन ईशस्तवन स्वागतगीत प्रमुख अतिथी स्वागत प्रास्तविक आनंदमयी शेक्षणिक गीत त्याच प्रमाणे स्टॉल लावून मुलांना विविध प्रकरची माहिती तसेच बौद्धिक क्षमता विकास शारीरिक विकास भाषा विकास असे अनेक प्रकारचे शिक्षण यावेळी देण्यात आले.