स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव अंतर्गत माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपालीका प्रशासन भंडारा व्दारे २९ मार्च रोजी भव्य सायकल परेड “

स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव अंतर्गत माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपालीका प्रशासन भंडारा व्दारे २९ मार्च रोजी भव्य सायकल परेड “

स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव अंतर्गत माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपालीका प्रशासन भंडारा व्दारे २९ मार्च रोजी भव्य सायकल परेड "

✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
!! मीडिया वार्ता न्युज !!
📱 8308726855 📱
📞 8799840838 📞

भंडारा :- महाराष्ट्र राज्यात गाजलेल्या भंडारा जिल्ह्यात भारतीय स्वातंत्र्याचा ७५ व्या वर्षानिमित्त ” आजादी का अमृत महोत्सव ” उपक्रमा अंतर्गत माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा व नगरपालीका प्रशासन भंडारा व्दारे दिनांक २९ मार्च २०२२ रोजी भव्य सायकल परेडचे आयोजन करण्यात आले आहे. यात आतापर्यंत १५०० नागरिकांनी या सायकल परेडसाठी नोंदनी केली आहे. तरीपण सायकल परेडमध्ये विद्यार्थी, सायकलपटु, खेळाडू यासह सर्व वयोगटातील नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आव्हाहन जिल्हाधिकारी मा. संदीप कदम यांनी आज केले आहे. २९ मार्च रोजी सकाळी ७:०० वाजता रेल्वे ग्राऊंड खात रोड भंडारा येथे सायकल परेडचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल परेडचा मार्ग रेल्वे ग्राऊंड खात रोड भंडारा खुर्सिपार नाका रेल्वे ग्राऊंड खात रोड या मार्गावरुण मार्गक्रमण करेल.
या सायकल परेडची पूर्वतयारी करीता जिल्हाधिकाऱ्यांनी काल रेल्वे ग्राऊंड खात रोड येथे अधिकारी, कर्मचारी यांचेसोबत चर्चा करुण त्यांना प्रशिक्षण तसेच आवश्यक निर्देश दिले आहे. नागरिकांना सायकल परेडमध्ये सहभाग नोंदविण्याकरीता जिल्हा प्रशासन मार्फत गुगल फॉर्म लिंक तसेच क्यूआर कोड तयार करण्यात आले असून गुगल आले आहे.
फॉर्म लिंक ( https // forms. gle/ yey 4525 JZMsBRK 3B7 ) वर माहिती भरुण अथवा क्यु आर कोड स्कॅन करूण नोंदणी फॉर्म भरुण सहभाग नोंदविता येईल. तसेच https:// bhandara.gov.in/ या संकेतस्थळावर सुद्धा लिंक उपलब्ध करूण देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी सदर सायकल परेडमध्ये नोंदनी करूण सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम शाहेब भंडारा यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी नगरपालिका प्रशासन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असुन जास्तीत जात संख्येने सहभागी होण्याचे निर्देश दिले आहे. व अपेक्षा बाळगली आहे.