नांदेडजिल्हा परिषदेत कार्यकारी अभियंत्याला कोंडले

नांदेडजिल्हा परिषदेत कार्यकारी अभियंत्याला कोंडले

नांदेडजिल्हा परिषदेत कार्यकारी अभियंत्याला कोंडले

✍बालाजी पाटील ✍
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
मो 9420413391

नांदेड : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याला कोंडून ५० हजार रुपयांची खंडणी मागणा-याविरुद्ध वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता ओमप्रकाश वैजनाथ निला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २३ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान आपल्या कार्यालयात असतांना मारोती बिच्चेवार हा व्यक्ती तेथे आला आणि त्याने कार्यकारी अभियंता कक्षाचे दार ढगलून तुम्ही शिवाजी वारकडकडे उपअभियंता पदाचा कार्यभार का देत नाही म्हणून त्यांच्याशी हुज्जत घातली.

तसेच तुम्ही फक्त मंत्र्यांचेच ऐकता असे सांगून निला यांच्या हातातील शासकीय संचिका हिसकावून फेकून दिल्या. जिल्ह्यात नोकरी करायची असेल तर मला ५० हजा शर रुपये द्यावे लागतील, असे म्हणून त्यांना धक्काबुक्की करून तु कसा नोकरी करतोस ते पाहुन घेतो अशी धमकी देत कार्यकारी अभियंता कक्षाचा दरवाजा बंद करून, त्याचा आतून कडीकोंडा लावला. त्यावेळी बाहेर असलेले सेवक मन्मथ नरवाडे यांच्यासोबत धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. वजिराबाद पोलीसांनी कार्यकारी अभियंता ओमप्रकाश वैजनाथ निला यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गोविंद जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.