सदर पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक २७ मार्च रोजी नागपूर येथे प्रणय सोहमप्रभा यांना प्रदान करण्यात येणार
सिद्धांत
२५ मार्च, मुंबई: मीडिया वार्ता न्युज मराठी साप्ताहिकचे नागपूर प्रतिनिधी यांना जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळा तर्फे “डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ” जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष डॉ .दीपककुमार खोब्रागडे यांनी पत्राद्वारे जाहीर केली.

प्रणय सोहमप्रभा आंबेडकरी विचार आणि चळवळीचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांची हि अभ्यासू वृत्ती त्यांच्या लिखाणातून वाचकांना सहज दिसून येते. आपल्या लेखनातून आंबेडकरी विचारांचा प्रसार आणि प्रचार करत ते समाजाच्या प्रश्नांना निडरपणे वाचा फोडत असतात. आंबेडकरी साहित्य क्षेत्रातील त्यांच्या ह्या योगदानाचा गौरव म्हणूनच त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.
सदर पुरस्कार डॉ . नितीन राऊत ,पालकमंत्री ,नागपूर,नागार्जुन सुरई ससाई ,नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी ,मंगलोरचे हिंदी विभाग प्रमुख डॉ . सुमाटी रोडनवर ,डॉ .रवींद्र तिरपुडे ,डॉ .गोविंदराव कांबळे, डॉ .दीपककुमार खोब्रागडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक २७ मार्च रोजी नागपूर येथे प्रणय सोहमप्रभा यांना प्रदान करण्यात येणार आहे.
प्रणय सोहमप्रभा यांनी लिहिलेले काही लोकप्रिय लेख. नक्की वाचा
https://www.instagram.com/p/CbGE28qtDCl/