शाळा पूर्वतयारी अभियाना अतंर्गत केंद्रस्थरीय प्रशिक्षण सपंन्न
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभिड :- पंचायत समीती अतंर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा किटाळी(बो.) येथे “शाळा पूर्वतयारी अभियाना” अतंर्गत एक दिवसीय केंद्रस्थरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रशिक्षणाचे उध्दघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र नागोसे याचे हस्ते करण्यात आले तर प्रशिक्षणाचे तज्ञ मार्गदर्शक प्रफुल वानखेडे, पिलाजी कांदे,यांनी मार्गदर्शन केले.सदत प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख श्रिकान्त मंदे यांनी परिश्रम घेतले. या प्रशिक्षणाला किटाळी(बो.) केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक, शिक्षिका, अगंनवाडी सेविका,आशा वर्कर, आदी शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते.