विशेष श्रमसंस्कार शिबीरा अंतर्गत सायबर क्राईम विषयक मार्गदर्शन*
शिबिरास मार्गदर्शक म्हणून ठाणेदार जीवन राजगुरू यांची प्रमुख उपस्थिती
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :-आज दिनांक २४मार्च २०२२रोज गुरूवारला जि.प.शाळा घडोली येथे सायबर क्राईम विषयी मार्गदर्शन व समस्येचा समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिरातील उपस्थित विद्यार्थ्यांना गोंडपिपरी चे ठाणेदार जिवन राजगुरु यांनी मार्गदर्शन केले.सायबर गुन्ह्यात विशेष करून हॅकिंग, प्रताधिकारभंग, बाल लैंगिक चित्रण इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारा बरोबर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत आहे.तेव्हा आपण स्तरावरून खबरदारी घ्यावी असे प्रतिपादन केले. शबिराला प्रमख अथिती म्हणून ॲड.रुपेश सुर अधिवक्ता गोडंपिपरी,पाटील सर कला-वाणिज्य महाविद्यालय गोंडपिपरी,सौ.सुनिता धोटे क.वा.महाविद्यालय गोंडपिपरी, सौ.शकुंतला शेंडे पो.पाटील घडोली,सौ.पोर्णिमा मेश्राम ग्राम पंचायत सदस्या घडोली,क.वा.महाविद्यालयातिल विद्यार्थी व विद्यार्थीनीची उपस्थिती होती