पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत येणाऱ्या गट ग्राम पंचायत डोंगरगांव उंदीरगाव येथील उंदीरगाव गावात नुतन अंगणवाडी चे ग्राम पंचायत डोंगरगांव पदाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन
बालगोपालांच्या म्हणात आनंद आनंदी गडे
सौ ममता बक्षी ग्राम सेवक गट ग्राम पंचायत डोंगरगांव उंदीरगाव सरपंच उपसरपंच यांची उपस्थिती
भिमराव देठे
भं तळोधी प्रतिनिधी
मो नं 8999223480
गोंडपिपरी :- पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत येत असलेल्या गट ग्राम पंचायत डोंगरगांव उंदीरगाव येथील उंदीरगाव येथे आज दि 25 मार्च रोजी नविन अंगणवाडी ईमारतीचे उद्घाटन ग्राम पंचायत डोंगरगांव उंदीरगाव येथील ग्राम पंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला उंदीरगाव हे गाव गट ग्राम पंचायत डोंगरगांव येथे मोडत असल्याने डोंगरगांव येथील सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्राम सेवक तसेच ग्राम पंचायत कर्मचारी यांच्या नेतृत्वाखाली हा उद्घाटन सोहळा आज सकाळी 11 – 30 ला संपन्न झाला या उद्घाटन सोहळा प्रसंगी ग्रामसेवक सौ ममता बक्षी .. सरपंच सौ मंगला साजन झाडे.. उपसरपंच श्री निलकंठ लखमापूरे.. सदस्य श्रीमती शोभाताई देवाळकर .. राजेंद्र झाडे .. महेश मडावी ..उंदीरगाव येथील सदस्य उंबरकर ..आणी दूधकोहर तसेच नविन अंगणवाडीत बसायला उत्सुकता असणारे बाल गोपाल ..व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते