बल्लारपुर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष पदी अरबाज सिद्दीकी तर जिल्हा महासचिव पदी शंकर महाकाली विजयी

बल्लारपुर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष पदी अरबाज सिद्दीकी तर जिल्हा महासचिव पदी शंकर महाकाली विजयी

बल्लारपुर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष पदी अरबाज सिद्दीकी तर जिल्हा महासचिव पदी शंकर महाकाली विजयी

✍सौ हनिशा दुधे✍
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
97642 68694

बल्लारपुर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अंतर्गत झालेल्या बल्लारपुर विधानसभा युवक काँग्रेस च्या निवडणुकीत विधानसभा अध्यक्ष पदी अरबाज़ सिद्दीकी तर जिल्हा महासचिव पदी शंकर महाकाली हे विजयी झाले असून या निवडणुकीत बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातुन ४३५६ मते अरबाज़ सिद्दिकीला मिळाली तर शंकर महाकाली यांना १५५ मते मिळाली आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की देशाचे युवा नेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून युवकांच्या संघाटत्मक लोकशाही पद्धतीने युवक काँग्रेस ची पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली.
पूर्व खा.नरेशबाबू पुगलिया मार्गदर्शनाथ व करण पुगलिया व चेतन गेडाम यांच्या नेतृत्वात
दि. १२ डिसेंबर २०२१ ला इंडियन युथ काँग्रेस या मोबाईल अॅप व्दारे प्रत्यक्षरित्या ऑनलाईन मतदान घेण्यात आले. लोकशाही पद्धतीने घेतलेल्या मतदान प्रक्रियेत बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातील युवकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले होते. काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सदस्य नोंदणी साठी दोन्ही युवक काँग्रेस च्या उमेदवारांनी पक्ष बांधणी साठी अथक परिश्रम घेतले. व सोबतच ऑनलाईन निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पाडली.या निवडणूकीत बल्लारपुर विधानसभा अध्यक्ष पदी अरबाज़ सिद्दीकी तर जिल्हा महासचिव पदी शंकर महाकाली हे बहुमताने विजयी झाले. तर विधानसभा उपाध्यक्ष चंचन मून, अक्षय घोडामारे,सोहेल खान, विकास श्रीवास,विक्की गुजरकर निवडून आले. चेतन गेडाम, सिकंदर खान, नरेश गुंडलपेली, आशीष मुडेलवार,यांनी पुढील वाटचालि साठी शुभेच्छा दिली.