सामान्य माणूस होरपळतोय महागाईच्या आगडोंबात
बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391
नांदेड : – मार्च महिना तसाही सर्वांसाठी डोकेदुखीचाच ठरतो. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाच्या झळांनी सर्वांना बेहाल करून सोडले होते. आता कोरोनाच्या या लाटेपासून कसेबसे सावरत असताना व अनेकांकडे बॅंकांची थकीत रक्कम झालेली असताना ती भरण्यासाठी बॅंकांकडून तगादा लावण्यात येत आहे. त्यामुळे बॅंकांची थकीत रक्कम ही मार्च एण्डच्या पूर्वी भरण्याची धडपड करणाऱ्या नागरिकांना आता महागाईचा चटका सहन करावा लागत आहे. ही महागाई आता नागरिकांच्या जीवावर उठली असून जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती तर गगनाला भिडल्या आहेत.
कोरोना संकटामुळे अनेकांचे वेतन रखडले, कोणाचे कमी झाले, अनेकांचा रोजगार हिरावला तर काहींचे उद्योगधंदे बुडालेत. अशा लोकांकडे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न आहे. शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक वर्षांपासून अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती न परवडणारी झाली आहे. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत चालल्याने जगावे की मरावे? अशी परिस्थिती सर्वसामान्यांवर आली आहे.
अग्रलेख : निर्वाहाचे ‘भविष्य’
निवृत्तीनंतरच्या जबाबदाऱ्याही वाढत गेल्या आणि मग प्रामुख्याने नोकरदार वर्गाला बचतीकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष द्यावे लागले.
राज्यातील 22 लाख शेतकऱ्यांना वीजेची अंदाजे बिलं! दहा ते 50 हजार भरण्याची अट
तीन एचपीचा विद्युतपंप असलेल्यांनी दहा हजार 260 रुपये, पाच एचपी मोटार असलेल्यांनी 18 हजार 300 रुपये, साडेसात एचपी मोटार असलेल्यांनी 29 हजार 250 रुपये आणि दहा एचपीचा विद्युत पंप असलेल्यांनी 45 हजार 900 रुपये भरुन वीज कनेक्शन तोडणी थांबवावी, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.