आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी स्वाभिमान संघटनेमधून हकालपट्टी राजु शेट्टी यांची शेतकरी मेळाव्यात घोषणा

आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी स्वाभिमान संघटनेमधून हकालपट्टी राजु शेट्टी यांची शेतकरी मेळाव्यात घोषणा

आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी स्वाभिमान संघटनेमधून हकालपट्टी राजु शेट्टी यांची शेतकरी मेळाव्यात घोषणा

✍ हर्षल राजेंद्र पाटील ✍
मोर्शी तालुका प्रतिनिधी
📱 8600650598 📱

अमरावती ( हिवरखेड ) – मोर्शी वरुड विधानसभेचे आमदार देवेंद्र भुयार यांचा आजपासून शेतकरी स्वाभिमानी संघटनेशी काही संबंध राहिलेला नसून त्यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे अशी घोषणा संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी हिवरखेड येथे भरलेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात केली
मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भव्य शेतकरी मेळावा दिनांक ,, 24/03/22 आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी साहेब , माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांनी मार्गदर्शन केले जे शेतकऱ्यावर अन्याय करतात त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत स्थान नाही , सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे शेतकऱ्याच्या जमिनीवर बांधलेल्या धरणामध्ये तयार झालेली वीज ही शेतकऱ्यांच्या हक्काची असून शेतकऱ्यांना दिवसा विजेचा पुरवठा झालाच पाहिजे यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्न चालू असून येत्या पंधरा दिवसात सरकारने यावर ठोस निर्णय न घेतल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याची घोषणा त्यांनी केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकाऱ्यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या बद्धल प्रचंड नाराजी व्यक्त त्याची संघटणेतून हकालपट्टी करण्याची एकमुखाने मागणी सुद्धा करण्यात आली होती तसे फलक हाती घेऊन कार्यकत्यांनी आमदारांची हकालपट्टी झालीच पाहिजे असे नारे लावले आणि शेट्टी साहेबांनी ही मोठी घोषणा केली
या कार्यक्रमाचे आयोजन अमोलभाऊ महल्ले आणि मित्रपरिवार यांनी केले होते