स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना स्थापना – १ मे २०२१ 

स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना स्थापना – १ मे २०२१ 

स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना स्थापना - १ मे २०२१ 

✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
!! मीडिया वार्ता न्युज !!
8308726855,8799840838

संघटना माहिती व कार्य :-
१) पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे त्याला पत्रकारिता करीत असताना अडचण येणार नाही याची काळजी घेणे.
२) पत्रकारांना शासनाकडून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संघटनेमार्फत प्रयत्न करणे.
३) वरिष्ठ पत्रकारांकडून कार्यशाळा घेऊन चांगल्या पत्रकारांची निर्मिती करणे.
४) पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्याचा विरोधात व त्यांच्या सुरक्षिततेसाठी एकत्रीत होऊन लढा देणे.
५) पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारची दगा येणार नाही व अन्यायाच्या विरोधात लढणे.
६) भारतातील सर्व पत्रकारांना एका प्लॅटफॉर्मवर घेऊन चांगल्या विचारांची देवाण-घेवाण करून सामान्य नागरिक एक शासन प्रशासन पोलीस प्रशासन यांच्यासोबत काम करणे.
७) आपल्या वृत्तपत्र, न्युज चॅनेल, डिजिटल मीडिया, पोर्टल न्युज चॅनेल, यामार्फत शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून शासनास सहकार्य करणे.
८) माहिती अधिकार काय आहे याची जनजागृती करून सर्व सामान्यांपर्यंत ही मोहीम पोहचवणे.
९) माहिती अधिकार यावर चर्चा सत्र घेऊन माहिती अधिकार कार्यकर्ते निर्माण करणे.
१०) माहिती अधिकार कार्यकर्त्यांना सुरक्षाकवच देणे.
११) आपला भारत देश विविध कलाकारांच्या कलेने नटलेला देश आहे म्हणून कलाकारांच्या कलेला योग्य व्यासपीठ मिळवून देणे.
१२) कलाकारांचे होणारे शोषण अत्याचाराच्या विरोधात एकजूट होऊन सर्व कलाकारांना सहकार्य करणे.
१३) नाट्य कलाकार, चित्रपट कलाकार, चितपट कामगार यांच्या अडचणी सोडविणे व त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे.
१४) माथाडी कामगारांचे शोषण थांबविणे व त्यांना संघटना मार्फत सहकार्य करणे.
१५) सर्वप्रकारच्या कामगारांना व माथाडी कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे.
१६) प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये होणाऱ्या बिलाचे व्हेरिफिकेशन करून रुग्णांना न्याय मिळवून देणे.
१७) शासकिय रुग्णालयात रुग्णांसाठी असलेल्या शासकिय योजनांची माहिती देऊन रुग्णांना सहकार्य करणे.
१८) रुग्णालयात ऍडमिट असलेल्या रुग्णांना सहकार्य करणे व इतर एनजीओंना यासाठी मोटिवेट करणे.
१९) होतकरू व गरिब विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या विषयांची कार्यशाळा घेऊन उद्योजक होण्यासाठी सहकार्य करणे.
२०) गरीब व होतकरू व गरजु विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करणे.
२१) पोलीस अधिकारी काम करित असताना त्यांना अनेक अडचणी येतात त्यांची कोणतीही संघटना नाही म्हणून पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबत काम करून त्यांच्या अडचणी सोडविणे व त्यांना सहकार्य करणे.
२२) नैसर्गिक आपत्ती आल्यास, दंगे झाल्यास,निवडणुका असल्यास, संचारबंदी असल्यास, मोर्चे आंदोलने असल्यास, पोलीस फोर्स कमी पडतो अशावेळी त्यांच्यासोबत पोलीस मित्र म्हणून काम करणे व पोलीसांना सहकार्य करणे.
२३) पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून नवयुवकांना पोलीसांच्या सोबत पोलीस मित्र म्हणून कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देणे.
२४) पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून व पोलीस मित्र समितीच्या माध्यमातून नवयुवक यांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देणे.
२५) देशाच्या एकंदरित उन्नतीसाठी जे काही करता येईल ते सर्व संघटनेच्या मार्फत करून शासनास योग्य ती मदत करणे.
२६) निसर्गाचे रक्षण करणे. आपले आद्य कर्तव्य आहे म्हणून संघटनेतर्फे झाडे लावणे, झाडे जगवा मध्ये पाणि वाचविणे या विषयावर चर्चासत्र घेऊन व कार्यशाळा घेऊन हरित भारताची निर्मिती करणे.