कोरची ते बोटेकसा मार्गावर खड्यांचे साम्राज्य
✍प्रविण पी. चौधरी✍
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
📞9545295702
कुरखेडा/कोरची:- गडचिरोली जिल्ह्यातील पूर्वेकडील तालुका म्हणून कोरची तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील शेवटचे गाव म्हणजे बोटेकसा. याच कोरची-बोटेकसा मार्गाची दरवर्षी थातुरमातुर डागडुजी केली. दररोज या मार्गावरून छत्तीसगढ कडे जाण्यासाठी अवजड वाहने वाहतूक करतात. हे कार्य रात्रदिवस चालते,त्यामुळे या मार्गाची अवस्था अल्पावधीतच “जैसे थे” होते. या वर्षी तर या मार्गावर मोठं मोठया खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने या भागातील नागरिकांची प्रवास करतांना खूप दमछाक होत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तरी जागे व्हावे.