” कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला बोनस न देणे हा शेतकऱ्यांशी धोका, बळीराजा चिंतेत “
” जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन “
भवन लिल्हारे भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
भंडारा :- महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यात दिनांक २५ मार्च २०२२ रोजी शेतकऱ्यांनी धानाला बोनस द्यावा करीता धरणे आंदोलन केले, यात धानाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्यामुळे बोनस देण्याची परंपरा तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस सरकारणे सुरु केली होती. मात्र धानाला बोनस नकारूण आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना धोका दिल्याचा आरोप माजी खासदार व भाजपा किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शिशुपाल पटले यांनी केला. भाजप किसान मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र सरकार चा निषेध करण्यासाठी आज २५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकरी आघाडी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे.
मात्र त्याला दिलासा देण्याचे धोरण सरकार राबविताना दिसत नाही. या धोरणाच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष शिशुपाल पटले, भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष हरेन्द्र राहांगडाले, भंडारा शहराध्यक्ष संजय कुंभलकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले गेले.
रब्बी पिकाची लागवड सुरु असल्यामुळे कृषी पंपाचे कनेक्सन कापणे थांबविण्यात यावे. कापलेले कनेक्सन त्वरीत जोडण्यात यावे. तात्काळ धानाला ७०० रुपये बोनस देण्यात यावा.
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार सानुग्रह अनुदान देण्यात यावे. धानाचे चुकारे देण्यात यावे. धडक सिंचन विहिरीचे प्रलंबीत बिले त्वरीत देण्यात यावेत. यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मा. संदीप कदम साहेब यांना देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रदिप पडोळे, भंडारा शहर जिल्हा परिषद गटनेता विनोद बांते, नितीन कडव, मुन्ना पुंडे, गणेश कुकडे, मयुर बिसेन, देविदास कुंभलकर, कल्याणी भुरे, कुंदा वैदय, तु. रा. भुसारी, शाम दलाल, भाष्कर निमजे, कांशिराम टेंभरे, दिनेश निमकर, ज्योतिष नंदनवार, रुबी चडडा, विकाश मदनकर, आबीद सिद्धीकी, मनोज बोरकर, मंगेश वंजारी, अमीत वसानी, सचिन बोपचे, आशिष कुकडे, राजकुमार मरठे, चरण ठाकरे, श्रावण कापगते, कैलास तांडेकर, माला बगमारे, रोशनी पडोळे, मधुरा मदनकर आदी उपस्थित होते.