कविता: झाडाची व्यथा

कविता: झाडाची व्यथा जनतेसमोर आणण्याचा छोटासा प्रयत्न

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

तोडू नको , जाळू नको , नकोनारे मला मारू,
तुझ्या सारखेच मलाही मन, भावना, शरीर आहे, मानवा हे नकोनारे तु विसरू…..

खूप त्रास होतोरे मानवा तुझ्या अशा क्रूर आणि निर्दयी वागण्याचा,
मनात माझ्या विचार येतो, कुणाच्याच मनात उरला नाही का गंध माणुसकीचा….

तुझ्या अशा वागण्याने प्रश्न मला पडतो नेहमी,
खूप तहान लागूनही, कुणाला मागू मी पाणी…..

…..अरे मानवा- मानवा ऐकणारे माझं…..

तुझ्या आजूबाजूला दे नारे मला सहारा,
तुझ्याच मुलाबाळांना देईन मी सावली आणि आसरा…..

अरे मानवा दया कर माझ्यावर नको करु रे माझी आणि जंगलाची तोडी,
वचन देतोरे तुला, मी जिवंत राहिलो तर कधीच पडणार नाही तुला फळे, फुले, पाने आणि ऑक्सिजनची कमी…..
…. ऑक्सिजनची कमी….

कविता: झाडाची व्यथा

राजेंद्र झाडे
मीडिया वार्ता न्युज
चंद्रपूर