भिसी येथे विठ्ठल मंदिर मध्ये एकनाथी भागवत सप्ताह निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
*गणेश सिताराम गभणे*
*चिमूर तालुका प्रतिनिधी*
*📱7798652305,8788618495📱
भिसी-श्री विठ्ठल रुखमाई देवस्थान भिसी येथे सुरू असलेल्या श्री एकनाथी भागवत सप्ताहाचे 55 वे वर्षिय श्री एकनाथी भागवत सप्ताह ला दिनांक 22 मार्च 2022 ला सुरुवात झालेली असून आज दिनांक: 26मार्च 2022ला सप्ताहाच्या पाचव्या दिवशी श्री विठ्ठल मंदिरामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले या शिबिरामध्ये अनेक भक्तांनी रक्तदान देऊन भिसी या गावाची एक नवी ओळख निर्माण केली. भिसी येथील श्री एकनाथी भागवत सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे भिसी गावा मध्ये भागवत समाप्ती च्या दिवशी हजारो नागरिक गावो गावून भिसी येथे गोपालकाला व महाप्रसाद घेण्या करिता येतात, आज विठ्ठल मंदिराच्या सभागृहा मध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजन केले त्या वेळी अनेक रक्त दात्यांनी रक्तदान केले त्या वेळी रक्तदाता सचिन गोहणे , विनोद गेडाम यांनी रक्तदान केले त्या वेळी जिल्हा परिषद सदस्या मा. सौ ममताताई डुकरे , मंदिराचे अध्यक्ष मा.श्री गरीबाजी निमजे आणि इतर सदस्य व भिसी वासीय जनता रक्तदान शिबिरा मध्ये सहभागी होण्या करीता उपस्थित होते.