ड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विषयक कार्यशाळा संपन्न*

 

ड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विषयक कार्यशाळा संपन्न*

ड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विषयक कार्यशाळा संपन्न*

*किशोर किर्वे* ✍
*महाड तालुका प्रतिनिधी*
*मो.९५०३०००९५९*

अलिबाग (रायगड):-अमृतमहोत्सवा निमित्त जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील पुरवठा विषयक बाबींसंदर्भात रास्त भाव धान्य दुकानदार, पेट्रोल पंप व डिझेल पंप धारक, एलपीजी गॅस वितरक, खाद्यतेल व खाद्यतेलबियांचे व्यापारी, शिवभोजन केंद्र चालक/मालक, ऑईल कंपन्यांचे जिल्हा संघटक व असिस्टंट मॅनेजर, तालुका पुरवठा शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांची दि.२५ मार्च २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.मधुकर बोडके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेमध्ये उप नियंत्रक वैधमापन शास्त्र श्री. राम राठोड अन्न व औषध प्रशासन विभाग, रायगडचे सहाय्यक आयुक्त श्री. लक्ष्मण दराडे भारत पेट्रोलियम गॅस कंपनीचे मॅनेजर श्री. विशाल काबरा, आय ओ.सी कंपनीचे श्री. मणिकंदन मुरलीधरण यांनी मार्गदर्शन केले तर रायगड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. शेखर देशमुख, पेट्रोल पंप धारक श्री. बाळकृष्ण पाटील, शिवभोजन केंद्र चालक श्रीमती.जेधे, रास्त भाव धान्य दुकानदार सुधागड तालुका अध्यक्ष श्री. हरिश्चंद्र पाटील रास्त भाव धान्य दुकानदार कौस्तुभ जोशी व अच्युत आपटे व माणगाव पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री. संजय माने यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. गोविंद वाकडे यांनी केले तर जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. मधुकर बोडके यांनी पुरवठा विषयक बाबींचे मार्गदर्शन केले तसेच आगामी काळात शासनाकडून सीएससी सेंटरच्या माध्यमातून राज्यातील रास्त भाव धान्य दुकानदार बॅंकांचे सर्व व्यवहार, रेल्वे विमान तिकीट बुकिंग, सर्व प्रकारचे बिल्स, उदा. लाईट बिल, फोन बिल, पाणी बिल, हेल्थ केअर सव्हिर्सेस, मोबाईल डीटीएच रिचार्ज, शेतीविषयक सर्व सेवा, इन्कम टॅक्स रिटर्न भरणे, नवीन रेशनकार्ड, दुबार रेशनकार्ड, नावामध्ये दुरुस्ती अर्ज, इत्यादी सेवा देऊ शकतील राज्यातील रास्त भाव दुकानदारांचे आर्थिक स्त्रोत वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य शासनाने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे विविध शासकीय सेवा पुरविता येणार असल्याबाबत सांगितले.

या कार्यशाळेस रायगड जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदार, तालुका संघटनांचे अध्यक्ष, पेट्रोल पंप व डिझेल पंप धारक, एलपीजी गॅस वितरक, खाद्यतेल व खाद्यतेलबियांचे व्यापारी, शिवभोजन केंद्र चालक/मालक, ऑईल कंपन्यांचे जिल्हा संघटक व असिस्टंट मॅनेजर, तालुका पुरवठा शाखेतील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here