मौजा देव्हाडी येथे १५२ घरकुल लाभार्थ्यांचे नाव यादीतून वगळल्याने ग्राम पंचायत महिला सदस्यांचे शासन व प्रशासना विरुद्ध आमरण उपोषण सुरूच
✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
!! मीडिया वार्ता न्युज !!
8308726855,8799840838
तुमसर :- भंडारा जिल्हा तुमसर तालुक्यातील मौजा देव्हाडी येथे ग्राम पंचायत सदस्यांचे उपोषण सुरुच आहे. दिनांक १५ ऑगष्ट २०१८ रोजी ग्रामसभेच्या मंजुरीने ५०० गरजू घरकुल लाभार्थ्यांची ” ड” यादीत नाव समाविष्ठ करून मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आली होती. परंतू केवळ ३४८ लाभार्थ्यांची नावे मंजूर करण्यात आली. उर्वरित १५२ घरकुल लाभार्थ्यांची नावे ही वगळण्यात आली. याचे कारण काय आहे हे मात्र शासन व प्रशासन मात्र सांगण्यास तयार नसल्याने लाभार्थ्यांत तीव्र असंतोष पसरला आहे. तत्पूर्वी ग्राम पंचायत सदस्या कुंदा बोरकर यांनी खंडविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घरकुल प्रकरणाची तक्रार केली होती. व अधिकाऱ्यांनी सात दिवसाची अवधी मागीतली होती, पण अधिकाऱ्यांनी सात दिवसान या प्रकरणाचा निपटारा न केल्यास देव्हाडी येथील १५२ अन्यायग्रस्त घरकुल लाभार्थ्यांन सोबत उपोषण करण्याचा इसारा दिला होता. परंतु प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे कुंदा बोरकर यांनी गरजू लाभार्थ्यांना योग्य न्याय मिळावा व घरकुल घ्यावा यासाठी उपोषन सुरु केले. उपोषन सुरु करताच खंडविकास अधिकारी मा. धिरज पाटील यांनी देव्हाडी येथील उपोषण मंडपात भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी घरकुल प्रकरणाबाबत लेखी हमी देण्याची मागणी केली. तरंतु खंडविकास अधिकारी धिरज पाटील यांनी लेखी हमी दिली नाही. यामुळे कुंदा बोरकर व त्यांचे सहकर्मी घरकुल लाभार्थी यांनी जो पर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा उपोशण सुरूच राहील अशा इसारा दिला.
शनिवारी माझी खासदार शिशुपाल पटले यांनी उपोषण स्थळावर भेट देऊन चर्चा केली त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यांच्याशी चर्चा केली. देव्हाडी येथे येऊन तुम्ही स्वःता या प्रकरणात लक्ष घालावे अशी विनंती केली. या संदर्भात खासदार सुनिल मेंढे यांच्याशी चर्चा करूण अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देऊ अशी मागणी केली.
मा माझी खासदार शिशुपाल पटले यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी वर चर्चा केली व प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणावर बसलेले संपूर्ण लाभार्थ्यांना सांत्वना दिली. व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देऊन त्यांना घरकुल योजनेचा लाभ देऊ अशी खासदार सुनिल मेंढे यांनी घोषना केली.