‘ कोरडा दिवस ‘ मोहीम
श्री प्रदीप मनोहर खापर्डे
कान्पा ग्रामीण प्रतिनिधी
मो. न. 8329084432
काम्पा : -नागभीड तालुक्यातील डोगरगाव (बु.) भागात मच्छरा मुळे हिवताप, डेंगू, हत्तीरोग असे आजार येतात. त्यासाठी आपल्याला गावात एक मोहीम राबवायची आहे. त्या मोहिमेचे नाव आहे. कोरडा दिवस ह्या मोहिमेद्वारे लोकांमध्ये जनजागृती आणायची आहे. की प्रत्येक आठवड्यात एक शनिवार हा आपण कोरडा दिवस म्हणजे की घरी साठवलेले वापरण्याचे पाणी किंवा टाक्यांमध्ये पाणी त्या शनिवार ला साठवायचे नाही ह्या मोहिमेचे महत्त्व की डास हे पाण्यात अंडी देतात. म्हणून पाणी फेकून डासाचे जीवनचक्र आपण त्यातून नष्ट करू शकतो. ह्या मोहिमेद्वारे आपण हिवताप डेंगू हत्तीरोग अशा आजाराला कमी करू शकतो. त्यासाठी सर्व डोंगरगाव बु. येथील जनतेने सहकार्य करावे. असे आव्हान कुमारी अश्विनी बांडेबुचे ( समुदाय आरोग्य अधिकारी) यांनी केले आहे