तालुक्यात मुरूम तस्करांचे “हौसले बुलंद”…!
शहराच्या मध्यभागातून प्रतिष्ठीतांसाठी “झिरो रॉयल्टी” मुरूम वाहतूक.
✍क्रिष्णा वैद्य✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी/विशेष
9545462500
ब्रम्हपुरी :- तालुक्याला लागलेले अवैध गौणखनिज उत्खननाचे ग्रहण उग्ररुप धारण करतांना दिसून येत असून, कुठलीही रॉयल्टी नसतांना शहराच्या मध्यवर्ती व तहसील कार्यालयाच्या अगदी जवळून सायगाटा परिसरातील शेकडो ब्रास अवैध मुरूम वाहतूक शहरातील प्रतिष्ठितांसाठी होतं असतांना काही प्रमाणात होतं असलेली अवैध तस्करी आजघडीला शतप्रतिशत प्रमाणात सुरु असल्याने तालुका महसूल प्रशासन अक्षरशः “वसुली प्रशासन” झाल्याचे नागरिकांकडून सर्वत्र चर्चीले जातं आहे.
एरवी छुप्या मार्गाने तस्करीला उधाण, रात्रीच्या काळोखात अवैध तस्करी, नाममात्र परवानगी मिळवीत मोठ्या अवैध तस्करीला चालना अशा प्रकारचे बरेच तस्करीचे प्रकार तालुक्याने बघितले आहेत मात्र ब्रह्मपुरी शहरापासून पाच ते सहा कि.मी अंतरावर असलेल्या सायगाटा गावानजीक दिवसाढवळ्या जेसीबी व इतर मोठ्या यंत्राद्वारे कुठलीही रॉयल्टी न घेता तहसील कार्यालयाचे आवार ते शहराच्या मध्यवर्ती भागातून अवैद्य मुरूम तस्करीतील ट्रॅक्टर व टिप्पर भरधाव वेगाने शहरातील नामांकित, लोकप्रतिनिधी व्यक्तींच्या प्रतिष्ठानांवर जात असल्याचे शहरवासीय उघड्या डोळ्याने पाहत आहेत.
तीन महिन्यापूर्वी मालडोंगरी परिसरातील दोन गटातून माफक शंभर ते दीडशे ब्रास परवानगी मिळवीत वाट्टेल त्या तीन ते चार गटातून अंदाजे एक हजार ब्रास मुरूम तस्करी च्या नंगानाचाने हिम्मत बळावलेल्या मुरूम तस्करांनी सायगाटा येथे कुठलीही मुरूम उत्खनन परवानगी न घेता तसे परवानगी नसल्याबाबत त्या साजाचे तलाठी स्पष्ट करीत असतांना कुणीचं कारवाई करण्यासाठी धजावत नसणे म्हणजेच “जब सैंया भये कोतवाल तो डर काहे का “…! अशी तालुक्याची अवस्था आजघडीला नागरिकांना स्पष्टपणे दिसून येत आहे.