जर खबरदारी घेतली नाही तर २०२५ मध्ये हिंदू राष्ट उदयास येईल :डॉ. नितीन राऊत

50

डॉ. यशवंत मनोहर यांच्या पुस्तकांचे पालकमंत्री मा. डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते प्रकाशन

प्रणय सोहमप्रभा
२७ मार्च, नागपूर: डॉ. यशवंत मनोहर यांनी आपल्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्याने आपल्या ४ पुस्तकांचे प्रकाशन केले. महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री व नागपूरचे पालकमंत्री मा. डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते ४ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आहे.
१.नक्षत्रांची वेल: ललित चिंतन, पियावी पब्लिकेशन्स, नागपूर
२.मूलतत्त्वी देशीयता की भारतीय वैश्विकता : देशीवादाचं खंडन, सुगावा प्रकाशन, पुणे
३.अनन्य विलास वाघ:व्यक्ति-विचार दर्शन,सुगावा प्रकाशन, पुणे
४.कवी आणि कविता: काव्यमीमांसा, युगसाक्षी प्रकाशन, नागपूर

हयाप्रसंगी बोलतांना मा. राऊत म्हणाले की, या देशातील जनता आज जागी झाली नाहीतर २०२५ पर्यंत भारत देश हा हिंदू राष्ट म्हणून उदयास येईल. भारतीय राज्यघटना जाऊन त्याजागी मनुस्मृती आणल्या जाईल व तिरंगा झेंड्याच्या जागी भगवा ध्वज उदयास येईल.

यावेळी प्रा. प्रिया मेश्राम, प्रकाशक, पियावी पब्लिकेशन्स, नागपूर, श्री. विनोद शहारे, इंजि. विलास वासनिक, सुगवा प्रकाशन, पुणे श्री. नितीन हनुवंते, युगसाक्षी प्रकाशन, नागपूर, मनोहर सरांचे विध्यार्थी व कुटुंबीय उपस्थित होते. सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या सदिच्छा व असेच लेखन करीत राहावे अशी विनंती केली.हयाप्रसंगी डॉ. मनोहर यांनी सर्वांचे आभार मानले.

इतर लोकप्रिय लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  ⬇⬇⬇