मिंडाळा सेवा सहकारी संस्थेवर काँग्रेसचे वर्चस्व
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभीड -तालुक्यातील मिंडाळा सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक काँगेसचे चिमूर विधानसभेचे नेते मा.सतिशभाऊ वारजूकर यांच्या मार्गदर्शनात दि.२५/०३/२०२२ ला पार पडली. अध्यक्षपदी विनोद देवानंद दुरबुडे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी लालाराम सखाराम समर्थ यांची निवड करण्यात आली.सहकारी संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे स्वागत माजी सभापती पं. स. नागभीड सौ. प्रणयाताई गड्डमवार यांनी केले,
सेवा सहकारी संस्थेचे सदस्य श्री. गजानन तुपकर, हरिजी चौधरी, सुखदेवजी लाऊत्रे,अरुनजी आंबोरकर, रामप्रभुजी गुरपुडे, दिनेश मांदाडे,श्रीमती लताताई नागोसे,श्रीमती रेखाताई भुजाडे यांचेही स्वागत करण्यात आले.यावेळी सरपंच श्री.गणेश गड्डमवार ,मुन्ना पाटील राऊत,स्वप्नील ननावरे,रामचंद्र चौधरी व मिंडाळा येथील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.