हिंगणघाट येथील रा.सु.बिडकर महविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी दिली करूनाश्रमाला भेट.
✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी: 8806839078
हिंगणघाट: आज दि. २७/३/२० रविवारी रा. सु. बिडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निराधार व बेघर लोकांच्या करूनाश्रमाला भेट दिली.
पिंपळगाव येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या श्रमदान शिबिरामध्ये रा. सु. बिडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. व यामध्ये विद्यार्थ्यांनी गावातील लोकांना स्वच्छतेचा संदेश देत स्वच्छता अभियान राबविले, रक्तदान, व लोकांच्या आरोग्याची तपासणी सुद्धा केली. त्याचप्रमाणे आज रविवार रोजी सकाळी आठ वाजता सागरबाग पिंपळगाव येथे श्रमदान केले , आणि त्यानंतर हिंगणघाट पिंपळगाव रस्त्यावरील निराधार व बेघर लोकांच्या करूनाश्रमाला भेट दिली व तेथेही श्रमदान केले,त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि यादरम्यान अनेक विद्यार्थ्यांचे अश्रुही अनावरण झाले होते.
करूनाश्रमातील लोकांच्या भावना जाणून घेताच विद्यार्थ्यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरांनी त्यांची मनेही जिंकली, व त्यांच्यामध्ये एक वेगळा आनंद निर्माण केला.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजु निखाडे, प्रा. डॉ. जया जॉन व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.