चामोर्शी तालुक्यात २६ वर्षीय युवकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या
चिचोर्डी शेतशिवारातील घटना
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
आष्टी- चामोर्शी :-शहरातील झिंगुजी वार्डातील एका 26 वर्षीय युवकाने विहीरीत आत्महत्या केल्याची घटना दि.26 मार्चला नगर पालिका क्षेत्रातील चिचोर्डी शेतशिवारात सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
बाळकृष्ण नागो नागपुरे असे मृत युवकाचे नाव असून तो भाजीपाला विक्रीचा व्यावसाय करीत असून अविवाहित होता.मृतक बाळकृष्ण हा बुधवार पासून घरून बेपत्ता होता.त्याची घरून बेपत्ता असल्याची तक्रारही पोलिसात कऱण्यात आली होती.त्याचा शोध सुरू असताना चिचोर्डी शेतशिवारातील एका विहीरीत मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मार्ग दाखल केला.शवविच्छेदना नंतर त्याचेवर मल्हारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला.त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.आत्महत्या का केली याचे मात्र कारण कळू शकले नाही.घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.