नांदेड हदगाव शहरात गरिबांचा फ्रीज दाखल

नांदेड हदगाव शहरात गरिबांचा फ्रीज दाखल

नांदेड हदगाव शहरात गरिबांचा फ्रीज दाखल

बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391

नांदेड : -जवळपास मार्च महिना संपलेला आहे तरी पण गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे शेतक-्यांच्या कामाची एकच खळबळ उडाली होती परंतु शुक्रवारपासून तालुक्यात ख-्या उन्हाची चाहूल लागली आहे त्यामुळे आता नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे त्यासाठी गरीबांचा फ्रीज म्हणून संबोधल्या जाणा-ाा माठाचे हदगाव शहरातील पंचशील शाळेच्या समोर बाजारात आगमन झाले आहे.
त्यासाठी माठ खरेदीसाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली असल्याचे दिसून येत आहे.गेली दोन वर्षांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे सतत होत असलेले लॉक डाऊनमुळे दोन वर्षे मडके बाजारात दिसलीच नसल्याने माठ विक्रेत्यावर उपासमारीची वेळ आली होती त्यामधून कसेतरी सावरत या वर्षी माठासाठी लागणा-्या कच्चा मालाच्या किंमतीत दुपटीने वाढ झाल्याने यावर्षी दोनवर्षाच्या तुलनेत माठाच्या किमतीत दुप्पटीने वाढ झाली आहे शहरातील पंचशील शाळेच्या समोर नांदेड रोडवर लहान मोठ्या आकाराची लाल. काळ्या.रंगाचे माठ रांजण आणि नळ लावलेले माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत त्याच बरोबर या दोन ते तीन दिवसात उन्हाचा तडाखा जास्त वाढल्याने माठाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून नागरिकांतून चांगली मागणी आहे.
मार्च एप्रिल मे महिन्यात उन्हाचा तडाखा जास्त असल्याने याच महिन्यात माठाला मोठी प्रमाणात मागणी असल्याने पुढील महिन्यात माठाचे भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी पण सर्वसामान्य लोकांना परवडेल अशीच किंमत असल्याने थंडगार पाणी पिण्याची तहान भागवेल हे मात्र नक्की आ�