हरिशचंद्र देवराज गजभियेंचा संघर्ष, कंत्राटी कामगार आणि कंपन्यातील संघर्षाचे उदाहरण

58

हरिशचंद्र देवराज गजभियें आपल्या मोबदल्यासाठी लढत आहेत तर कंपनी आपल्या म्हणण्यावर ठाम

मीडिया वार्ता न्युज
२८ मार्च, अमरावती: कंपनी आणि त्यांद्वारे चालणारे प्रोजेक्ट आणि त्या प्रोजेक्ट्वर काम करणारे कामगार यांच्यामधील मधील वाद तसे काही नवीन नाहीत. जगभर असे वाद होत राहतात. दुर्दैवाने बहुतेकदा अश्या प्रकरणामध्ये अन्याय हा कामगारांवर होत असतो.

हरिशचंद्र गजभियेंचाही अमरावतीमधील रतन इंडिया पॉवर लिमिटेड या कंपनीशी असाच वाद चालू आहे. गजभियें यांनी कामगार आयुक्तांना अर्ज देऊन निवेदन केले कि, ते रतन इंडिया पॉवर लिमिटेड या कंपनीच्या अंतर्गत रेल्वे डिपार्टमेंटमध्ये “ऑपरेटर” या पदावर कार्यरत २०१६ पासून कार्यरत होते. ४ सप्टेंबर २०२० मध्ये त्यांना कामावरून बंद करण्यात आले. आणि या दरम्यान शासन नियमानुसार बोनस आणि लिव्ह मिळावी तसेच कोणतीही कारण न देता कामावरून बंद केले असल्याने पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे. अश्या मागणीचा अर्ज त्यांनी आयुक्तांकडे दाखल केला.

यांवर कंपनीने स्पष्टीकरण देत म्हटले कि, हरिश्चंद्र गजभिये हे रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे कर्मचारी नसून ते एक कंत्राटी कामगार होते. त्यामुळे त्यांचा आणि कंपनीचा थेट संबंध नाही.

कामगार आयुक्तांकडे दाखल केलेल्या अर्जामध्ये हरिशचंद्र गजभियें यांनी कंपनीवर फसवणुकीचा आरोप करून, कंपनीने त्यांना कामावरून काढून कामगार नियमांचे उल्लंघन केले असल्याचे विधान केले आहे. यादरम्यान होणाऱ्या मनस्तापाला कंटाळून हरिशचंद्र देवराज गजभियें यांच्याकडून विषप्राशन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

कोरोनाकाळात बिघडलेली आर्थिक परिस्थती आणि त्यातच वाढती महागाई यांमुळे अडचणीत आलेल्या अकुशल कामगार आणि त्याच्या समस्यांकडे प्रशासनाने गंभीरतेने लक्ष लक्ष घालून त्या समस्यांचे जलद गतीने निराकरण करणे गरजेचे आहे.

इतर लोकप्रिय लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  ⬇⬇⬇