उत्स्फूर्त प्रतिसादात “बौद्धिक विकास कार्यशाळा” संपन्न
गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०
मुंबई- TISD हे प्रशिक्षण केंद्र सामाजिक जाणिवेतून विविध लोकहितेशी कौशल्यावर आधारित कार्यक्रम घेत असताना दिनांक 27 मार्च 2022 रोजी सायं 7 वाजता
सलग दुसऱ्यांदा TISD या प्रशिक्षण केद्रांने बौद्धिक विकास कार्यशाळा विद्यार्थी यांचा बौद्धिक विकास होण्यास त्यांना मदत व्हावी व मुख्यकरून त्याच्या परीक्षेच्या वेळात त्यांना परीक्षेस सामोरे जाण्यासाठीचे मार्गदर्शन व्हावे म्हणून आयोजित केली होती ही बौद्धिक विकास कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली या निमित्ताने सर्व विद्यार्थी ,पालक , TISD सहकारी , तसेच विशेषतः या कार्यक्रमाला लाभलेल्या मिस. निकिता तांबे मॅडम आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद .
सदर कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अगदी साध्या, सोप्या आणि सहज भाषेत समजेल अशा Activity तसेच अभ्यास कसा करावा, कधी करावा, त्यासाठी पूरक आणि पोषक वातावरण निर्मिती कशी करावी याबद्दल खूप योग्य पद्धतीने निकिता मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
पुढे देखील असे लोकजाणिवेतून नाविन्यपूर्ण समाजहितेशी कौशल्यावर आधारित उपक्रम TISD या संस्था मार्फत राबविण्यात येणार असून आपण पुढील उपक्रमांच्या माहिती साठी TISD च्या अधिकृत फेसबुक पेजला भेट द्यावी असे आयोजकांकडून सांगण्यात आले.