प्रेस संपादक व पत्रकार सेवा सघांची माणगांव तालुका कार्यकारणी जाहीर

60

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्याना संघाचे महाराष्ट्र राज्य संस्थापक डी टी आंबेगावे व विभागीय जिल्हा अध्यक्ष व महाड तालुका पदाधिकाऱ्यानी पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या

प्रेस संपादक व पत्रकार सेवा सघांची माणगांव तालुका कार्यकारणी जाहीर

सचिन पवार
मो: ८०८००९२३०१
२९ मार्च, माणगाव: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे याच्या उपस्थिती मध्ये माणगांव तालुका व शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची माणगांव तालुका कार्यकारणी अशी : रिजवान मुकादम माणगांव तालुका अध्यक्ष, सचिन वामन पवार माणगांव तालुका कार्याध्यक्ष,मानसी दिनेश महाडिक कार्यकारिणी सद्यस्थ,मंगेश संपत मेस्त्री माणगांव तालुका संपर्क प्रमुख,दत्ता नाईक कार्यकारिणी सद्यस्थ, विवेक संतोष काटोलकर कार्यकारिणी सद्यस्थ, राजेंद्र बुरबे कार्यकारिणी सद्यस्थ, दीपक दपके कार्यकारिणी सद्यस्थ त्याच प्रमाणे प्रसाद गोरेगावकर याची रायगड जिल्हा संघटक निवड करण्यात आली.

यावेळेस दत्तात्रय दळवी रायगड जिल्हा संघटक, योगेश भाबरे रायगड जिल्हा अध्यक्ष, किशोर किर्वे महाड तालुका अध्यक्ष, सौ रेश्मा माने महाड, सागर पवार महाड, अभिजित ढानिपकर, राकेश देशमुख महाड याच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम सोहळा पार पाडला प्रेस संपादक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांनी आपले अनमोल असे मार्गदर्शन केले त्यावेळी माणगांव तालुका अध्यक्ष रिजवान मुकादम व माणगांव तालुका कार्यध्यक्ष सचिन पवार यांनी माणगांव तालुक्याच्या वतीने पत्रकार व त्याचे कुटूंब, सामाजिक, शेक्षणिक व आरोग्य क्षेत्रामध्ये खूप कार्य करणार असल्याचे सांगितले.

हे आपण वाचलंत का?

 

माणगांव तालुका कार्यकारिणीच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्याना संघाचे महाराष्ट्र राज्य संस्थापक डी टी आंबेगावे व विभागीय जिल्हा अध्यक्ष व महाड तालुका पदाधिकाऱ्यानी पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.