आज भिसी येथे एकनाथी भागवत सप्ताहाची सांगता व गोपालकाला आणि महाप्रसाद
**गणेश गभणे*
*चिमूर तालुका प्रतनिधी*
** 📱 *7798652305,8788618495* 📲
दि. २२/०३/२०२२पासून सुरु झालेल्या भागवत सप्ताहाची काल सायंकाळी सांगता झाली, रात्री ११ : ३० वाजता भारुडाचा कार्यक्रम पार पडला. तसेच
आज दिनांक:२९/०३/२०२२ ला महाप्रसाद आणि गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या निमीत्ताने एकनाथी भागवत सप्ताहाची पालखी व शोभा यात्रा काडण्यात आली या मध्ये गजानन महाराज पालखी यात्रा,आदीशक्ती माता महाकाली मातेची शोभा यात्रा आणि भगवत गिताची भव्य शोभयात्रा काडून भिसी वासिय जनतेला भगवत गीतेचे दर्शन घेता आले ही पालखी यात्रा मंदिरा पासून सुरू होऊन संपूर्ण भिसी मध्ये काळण्यात आली त्या वेळी मंदिराच्या वतीने सर्व भाविक भक्तांना तसेच भिसी व भीसी परिसरातील जनतेला गोपालकाला व महाप्रसाद घेण्या करिता उपस्थित राहावे. असे विठ्ठल रुख्मिणी देवस्थान ट्रस्ट कडून आवाहन करण्यात आले आहे. शोभा यात्रा व पालखी मंदिरात परत आल्या नंतर गोपालकाल्याच्या कीर्तनाला सुरुवात करण्यात आली. भीसी येथील टायगर ग्रुप भिसी च्या वतीने मोफत पाणपोई वाटप करण्यात आले त्या वेळी टायगर ग्रुप चे अध्यक्ष अक्षय नागपुरे , उपाध्यक्ष सैलेश आजबणकर, सदस्य, अंकित बानकर, गौरव बोरकर , अक्षय सतपैसे , यश कोथले, नंदू चाचारकर नागेश्वर नागपुरे प्रज्वल आंमवकर , सैलेश बावणे, जितू खोब्राकडे राकेश शिवरकर , इतर पदाधिकारी उपस्थित होते
भिसी येथे दरवर्षी एकनाथी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.पंरतू दोन वर्षापासून कोरोनामुळे खंड पडण्यात आला
सन २०२० आणि सन २०२१ला कोरोनामुळे भागवत सप्ताह्याचे आयोजन होऊ शकले नाही.
त्यादृष्टीने दोन वर्षानंतर होणाऱ्या सप्ताह्यामध्ये लोकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसतानाचे काही शन टिपले गेले.