” शिक्षण घेहुनही बेरोजगार असल्याने कौलेवाडा डॅम येथे गोंदियाचे कृषीलेश राजु कनोजे या तरुणाने नैराश्यातून केली आत्महत्या “
✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
!! मीडिया वार्ता न्युज !!
8308726855,8799840838
तुमसर :- गोदीया जिल्हयातील बेरोजगार युवक याने कौलेवाड डॅम येथे जाऊन आत्महत्या केल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. मृतक नामे कृषिलेश राजु कनोजे वय २९ वर्षे शिक्षण बि कॉम पास रा . श्रीनगर चंद्रशेखर वार्ड गोंदीया या तरुणाने बेरोजगारी, नोकरी न मिळत असल्याने हतासपनाने निराश होऊन आत्महत्या केली. फिर्यादी हा मृतकाचा भाऊ याने म्हणजेच क्षितीज राजु कनोजे वय २६ वर्षे धंदा नोकरी यांनी पोलीस स्टेशनला तोंडी रिपार्ट दिली की, त्याचा भाऊ कृषिलेश हा सन २०१३ पासुन स्पर्धा परिक्षा देऊन शुद्धा तो नौकरीला लागत नसल्याने तो नेहमी नोकरीच्या चिंतेत राहत होता. तसेच दिनांक २७ मार्च २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजे दरम्यान सर्वजन घरी असतांना कृषिलेश हा घरी कोणाला काही न सांगता घरची मोटार सायकल क्रमांक एम एच २९ एए ८३८२ हि घेऊन गेला होता. सायंकाळी ६.०० वाजता कृषिलेश याने त्याचे वडिलाचे मोबाइलवर त्याने व्हिडिओ कॉल करून सांगितले की, तो कवलेवाडा डॅम येथे आत्महत्या करीत आहे. असे सांगुन मोबाइल मध्ये व्हिडीओ कॉल रेकॉर्डिग करून आत्महत्या केली.
मय्यत मुलगा हा सध्या कोणत्याही प्रकारची नोकरी व कामधंदा नसल्याने त्याने टेन्शनमध्ये आत्महत्या केली .
असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. त्याचे मरणाबाबत फिर्यादीला कोणावरही संशय किंवा तक्रार नसल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुण पोलीस स्टेशनला पोलीस हवालदार लिल्हारे यांनी मर्ग दाखल केलेला असुन पुढील चौकषी सिहोराचे ठानेदार नारायण मुरकुंडे हे करीत आहे. पुढील तपास सुरु आहे.