मोहाडी येथील ब. उ. परमपुज्य परमात्मा एक भवन येथे महिला सम्मेलन व सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न “

मोहाडी येथील ब. उ. परमपुज्य परमात्मा एक भवन येथे महिला सम्मेलन व सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न “

मोहाडी येथील ब. उ. परमपुज्य परमात्मा एक भवन येथे महिला सम्मेलन व सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न "

✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
!! मीडिया वार्ता न्युज !!
8308726855,8799840838

मोहाडी :- भंडारा जिल्ह्यातील मौजा मोहाडी येथील ब. उ. परमपुज्य परमात्मा एक भवन आंधळगाव रोड मोहाडी येथे दिनांक २७ मार्च २०२२ रोजी महिला जागतिक दिनानिमीत्त महिला सम्मेलन, सत्कार समारंभ , सांस्कृतीक कार्यक्रम व विविध खेळांची स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, समुह नृत्य स्पर्धा, इनडोअर स्पर्धा, कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सौ. रंजीता राजू कारेमोरे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले, त्यावेळी कोवीड वारियर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, महिला पोलीस, महिला होमगार्ड, महिला डॉक्टर नर्स, महिला जिल्हा परिषद सदस्या, व मोहाडी तालुक्यातील वर्ग १० वी १२ वी मधून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना सौ. रंजीता राजु कारेमोरे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ, ट्रॉफी व आकर्शक बक्षिस देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख महिला पदाधिकारी, समाज सेविका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य नगरपंचायत सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, महिला भगिनी, व मोहाडी ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते, संयोजिका सौ. रंजीता राजु कारेमोरे महिला भगिनी व सखी मंडळ मोहाडी यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.