१३००० सिंचन विहिरी कार्यक्रम २०१ ९ -२० अंतर्गत सिंचन विहिर कार्यारंभ आदेशाची पायमल्ली . मा .मुख्यमंत्री , उध्दवजी ठाकरे साहेब व मा. प्रधान सचीव रो ह यो महाराष्ट्र राज्य . यांना – मा . जिल्हाधिकारी , जिल्हा गडचिरोली कार्यालया मार्फत निवेदन.

१३००० सिंचन विहिरी कार्यक्रम २०१ ९ -२० अंतर्गत सिंचन विहिर कार्यारंभ आदेशाची पायमल्ली .

मा .मुख्यमंत्री , उध्दवजी ठाकरे साहेब व मा. प्रधान सचीव रो ह यो महाराष्ट्र राज्य . यांना – मा . जिल्हाधिकारी , जिल्हा गडचिरोली कार्यालया मार्फत निवेदन.

१३००० सिंचन विहिरी कार्यक्रम २०१ ९ -२० अंतर्गत सिंचन विहिर कार्यारंभ आदेशाची पायमल्ली . मा .मुख्यमंत्री , उध्दवजी ठाकरे साहेब व मा. प्रधान सचीव रो ह यो महाराष्ट्र राज्य . यांना - मा . जिल्हाधिकारी , जिल्हा गडचिरोली कार्यालया मार्फत निवेदन.

✍ विनोद कोडापे✍
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380802959📱

गडचिरोली : -शिवसेना प्रणीत वाहतुक सेना व कामगार सेना जिल्हा गडचिरोली या संघटनेने गावा – गावात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाण्याची मोठी समस्या आमच्या समोर आली . शेतकरी देशाचा पोशीदा म्हणून शब्दाने आदर करतो पण प्रत्यक्षात त्याची शासन प्रशासन स्तरावर खुप मोठी चेष्टा केली जाते हे प्रत्यक्षात पाहायला मिळते . जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १३००० सिंचन विहिर कार्यक्रमाअंतर्गत सिंचन विहिर कार्यारंभ आदेश दिलेले त्यांनी दाखविले . या आदेशाला २ वर्ष पूर्ण झालेली आहेत . या आदेशाची काही दिवसात मर्यादा संपलेली असेल पण त्यांना निधी नाही हे सांगुन वारंवार वापसी पाठविण्यात येत आहे . आपण या राज्याचे प्रमुख आहात , तसेच या योजनेचे सुध्दा प्रमुख आहात . शेतकऱ्यांचे पाठीराखी आहात , एवढे असून सुध्दा शेतकऱ्यांना आपणाकडून ही हाल अपेष्टा भोगावे लागत आहे . त्यांना विहिरी मिळाल्या तर त्यांचे जीवन सुधारण्यास सुरुवात होईल . गडचिरोली जिल्हयात १७०० सिंचन विहिरीचे लक्षांक होते . आपल्याकडे प्राप्त अर्ज १०४३० आलेत . डाऊनलोड केलेल्या अर्जांची संख्या ६०६८ पैकी पात्र अर्ज ४५७७ होते . त्यात मंजूर अर्ज १६७७ आणि प्रतिक्षार्थी अर्ज २ ९ ०० आहेत . मंजूर अर्जांची संख्या १६७७ सिंचन विहिरीचे काम सुरू करून पूर्ण केले तर १६७७ कुटूंबाची आर्थिक अडचण दूर होईल आणि १६७७ शेतकरी आपली शेती ओलीत करून उत्पादन वाढवतील . प्रत्येक शेतकरी एक हेक्टर जमीन ओलीत करू शकला तर साधारण ४००० एकर जमीन गडचिरोली जिल्ह्याची प्रति ,ओलीताखाली येईल त्यामुळे जिल्ह्याचे उत्पादनात वाढ होईल . गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाहेर जिल्ह्यात किंवा बाहेर राज्यात मजूरीसाठी जावे लागणार नाही . आणि गडचिरोली जिल्ह्यात भाजीपाल्याची मोठी बाजारपेठ तयार होईल . एकंदरीत गडचिरोली जिल्हा मागास जिल्हा म्हणून ओळखला जाणार नाही यासाठी १३००० सिंचन विहिर योजना जिल्हा गडचिरोलीला तात्काळ निधी पुरवठा करून देण्यांत यावा . मंजूर सिंचन विहिरींना निधी रूपये ४२ कोटी पैकी फक्त ५ कोटी ९ ४ लाख निधी प्राप्त झालेला आहे . जवळपास उर्वरीत ३७ कोटी रूपये तात्काळ पाठविण्याची विनंती १३००० सिंचन विहिर योजनेचे लाभार्थी करीत आहेत . मा . मुख्यमंत्री साहेब , महाराष्ट्र राज्य आपण याकडे जातीने लक्ष घालून तात्काळ सर्व शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून कार्यारंभ आदेश रद्द न होवू देता पुढील पिकासाठी सिंचन विहिरी पूर्ण करून देण्यांत यावा व हे आदेश रद्द होणार नाही याची १५ दिवसाच्या आंत जिल्हा कार्यालय , गडचिरोली यांना माहिती देण्यांत यावी यासाठी शिवसेना प्रणीत वाहतुक सेना व कामगार सेना जिल्हा अध्यक्ष कबिर धर्माजी निकुरे गडचिरोलीचे जिल्हा संघटक श्री देवराव गोविंदा दुधबळे,जिल्हा उपाध्यक्ष चांगदास मसराम ,विकास रामटेके व रंजना मेश्राम, बापूजी फरांडे,अनिल कोलते, हरिदास कुमरे, लक्ष्मण घोडाप, केवळराम मस्के, यशवंत पेंदोरकर, श्रीकृष्ण प्रधान व गडचिरोली जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते आपल्याला शेतकऱ्यांच्या मार्फतीने विनंती करून निवेदन सादर करीत आहे .