मा.बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रयत्नाने नागभीड येथील चिमुकलीच्या भविष्यासाठी आर्थिक सहकार्य
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभिड-नगरपरिषद नागभीड प्र.4 येथील श्री.संजयजी तांदुळकर गरीब कुटुंबातील असून काही दिवसापूर्वी त्यांची पत्नीला प्रसूती करीता ग्रामीण रुग्णालयात, नागभीड येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. व त्यांनी मुलीला जन्म दिला,परंतु ऑपरेशन दरम्यान अतिरक्तस्राव झाल्याने त्यांना चंद्रपूर रुग्णालयात हलविण्यात आले व उपचारादरम्यान डॉक्टरांच्या चुकीमुळे त्यांचे निधन झाले. व तांदुळकर परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले. आईचे छत्र हरविलेल्या *कू. नायरा* बद्दल स्थानिक भाजपा पदाधिकारी शिरीष वानखेडे नगरसेवक, गणेश तर्वेकार उपाध्यक्ष न.प.नागभीड,सचिन आकुलवार बांधकाम सभापती यांना कळताच त्याची माहिती आमदार साहेबाना देताच कर्तव्यदक्ष,गरिबांचे कैवारी,मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार साहेब यांच्या अथक प्रयत्नांनी व भाजपा पदाधिकारी ,कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कू.नायरा संजय तांदुळकर हिच्या भावी आयुष्यासाठी रुपये 4 लाख 80 हजाराचे रोखे तयार करून भाजपा पदाधिकारी मार्फत तिच्या वडिलांना मदत देण्यात आले.
रोखे देतांना संजय गजपुरे जिल्हा संघटन महामंत्री,संतोष रडके तालुका अध्यक्ष,गणेश तर्वेकार उपाध्यक्ष न.प.नागभीड,अमीर धम्मानी सर, गोपालजी गिऱ्हेपुंजे,विजुभाऊ काबरा,शंकरभाऊ कावळे,गणेशभाऊ पुंडे,रविभाऊ पोलकमवार, तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.