गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी व कृषी महाविद्यालय सोनापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय कुकूटपालन व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.
✍ विनोद कोडापे✍
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380802959📱
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीचा वापर करीत असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या असून चांगल्या दर्जाचे जीवनमान जगू शकत नाही. त्यामुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेती पूरक उद्योगासाठी वाव देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व कृषी महाविद्यालय गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमानाने दिनांक 29/3/2022 रोजी एकदिवसीय कुकूटपालन व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम पार पाडण्यात आले.
सदर कुकुटपालन प्रशिक्षणात पोलीस उपविभाग धानोरा, गडचिरोली कार्यक्षेत्रातील दुर्गम भागातील 150 एक शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान मुकुट पक्षांचे पिल्लांची जोपासना कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून सुरक्षारक्षक 143,नर्सिंग असिस्टंट 1143, ऑटोमोबाईल्स 254 ,इलेक्ट्रिशन 140, प्लंबिंग 27 ,वेल्डिंग 33 ,जनरल ड्युटी असिस्टंट 38, पिल्ड ऑफिसर 11, तसेच व्हीएलई 45 असे एकूण दोन हजार चारशे युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आले.
सदर कार्यक्रम माननीय पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सा.यांचे संकल्पनेतून व .मा अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री समीर शेख सा.मा अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री सोनम मुंडे सा. अप्पर पोलिस अधीक्षक अहेरी श्री अनुज तारे सा. यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. असून, या कार्यक्रमा प्रसंगी मा. अप्पर पोलिस अधीक्षक (प्रशासन) श्री समीर शेख सा. प्रकल्पसंचालक आत्मा श्री. संदीप कऱ्हाडे, मा. डाक्टर प्रकाश कडू सहयोगीता अधिष्टतासंदीप कऱ्हाडे कृ. म. वी. सोनापुर मा. डाक्टर आनंद ठींगरे कार्यक्रम समन्वयक कृषि महाविद्यालय सोणापुर गडचिरोली हे उपस्थित होते.