आयटकच्या वतीने खाजगी करणाच्या विरोधात जिल्हा परिषदेवर विराट मोर्चा

आयटक च्या वतीने खाजगी करणाच्या विरोधात जिल्हा परिषदेवर विराट मोर्चा “

आयटक च्या वतीने खाजगी करणाच्या विरोधात जिल्हा परिषदेवर विराट मोर्चा "

✍ भवन लिल्हारे ✍
!! भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी !!
!! मीडिया वार्ता न्युज !!
8308726855,8799840838

भंडारा :- विदर्भातील भंडारा जिल्हा येथील जिल्हा परिषद कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. दिनांक २८ व २९ मार्च २०२२ रोज सोमवार व मंगळवार असे दोन दिवशीय केंद्र व राज्य सरकारचे कामगार विरोधी धोरण व खाजगीकरणाच्या विरोधात देशव्यापी संपाचे अनुषंगाने २८ मार्च २०२२ ला आयटकच्या वतीने बसस्थानका वरुण जिल्हा परीषदेवर भव्य विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष मा. कामरेड शिवकुमार गणवीर, जिल्हा सचिव कॉ, हिवराज उके, अंगणवाडी युनियन च्या अध्यक्ष कॉ. सविता लुटे, यांनी केले.
मोर्चाचे रूपांतर मात्र जिल्हा परीषदेसमोर झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड माधवराव बांते हे होते. प्रास्ताविक भाषणात जिल्हा सचिव कॉ. हिवराज उके यांनी केले. व मोर्चाची भूमीका स्पष्ट केली. तर प्रमुख मार्गदर्शन आयटकचे कार्याध्यक्ष कॉम्रेड शिवकुमार गणवीर यांनी केले.
याप्रसंगी अंगणवाडी युनियनच्या अध्यक्षा कॉ. सविता लुटे, आशा युनियनच्या सचिव भूमीका वंजारी, अंगणवाडी सभेच्या सौ किसनाबाई भानारकर, पोस्टल युनियनचे टी.एस. लांजेवार, हातपंप युनियनचे सतीश वासनिक, शालेय पोषन युनियनचे राजु बडोले, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन चे कॉम्रेड वैभव चोपकर
यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर प्रधानमंत्री माननीय नरेन्द्र मोदी व मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नावे माननीय मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद भंडारा यांचे मार्फत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणि पुरवठा ) डॉ. संघमित्रा कोल्हे यांनी निवेदन स्विकारले.
निवेदनात प्रामुख्याने श्रम कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यात यावा. केन्द्र सरकारने नुकतेच ४४ श्रम कायद्याचे रूपांतर चार कोड मध्ये केले आहे. जे कामगार हितासाठी घातक असुन मालक व व्यवस्थापना च्या हिताचे आहेत. हे ४ कोड ताकाळ मागे घेण्यात यावे. सध्या केन्द्र सरकार नफ्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्राचे निर्गुंतवणुकीचे नावावर झपाट्याने खाजगीकरण करीत आहे ते सर्व बंद करावे.
आशा गटप्रवर्तक, आंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य स्त्री परिचर, इत्यादी असंघटित क्षेत्रातील सर्वच कामगारांना किमान वेतन लागू करूण त्यांना भविष्य निर्वाह निधी पेन्सन इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू करावे. महागाईचा निर्देशांकाप्रमाणे किमाण २१ हजार रुपये किमान वेतन सर्वांना लागू करावे. घरेलु कामगारांकरीता केन्द्रीय स्तरावर कल्यान मंडळ असावे. व इतर जमिनीवरील अतिक्रमण धारकांना मालकीचे पट्टे देण्यात यावे.
एसटी कामगारांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवून सन्मानपूर्वक कामावर घ्या व महाराष्ट्रातील जनतेसाठी एसटी वाचविण्यात यावे इत्यादी १५ मागण्यांचा समावेश होता. आंदोलनात सुमारे २,००० हजार महिला पुरुष कामगार कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यात प्रामुख्याने गजानन पाचे, वामनराव चांदेवार, मंगला गजभिये, अल्का बोरकर, रिता लोखंडे, रेखा टेंभूर्णे, आशिष मेश्राम, रामलाल बिसेन, महानंदा नखाते, आर. एस. लिल्हारे, आर. डी. ठवकर, पुष्पा हुमणे, कल्पना साठवणे, सुभाष आचबले, ज्ञानीराम गभने, मा. भवनभाऊ लिल्हारे मीडीया वार्ता न्युज पत्रकार, मा. रोशन लिल्हारे, मा. प्रशांत नागपुरे, नरेन्द्र लिल्हारे, मा. गुलाब सव्वालाखे, चिनीलाल बशिने मयुर सव्वालाखे, आदींचा समावेश होता.