पत्नीचा विष प्राशनामुळे मृत्यू ; पतीनेही फेसबुक लाईव्ह करत रेल्वेखाली केली आत्महत्या

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

जळगाव :- शहरातील कांचननगर परिसरात रहिवासी असणाऱ्या प्रमोद शेटे या तरूणाची पत्नी कांचन प्रमोद शेटे (वाणी) हिने विष प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर प्रमोद शेटे याने फेसबुक लाइव्ह करत मंगळवारी सकाळी रेल्वे खाली
आत्महत्या केली. पाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी दाम्पत्याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे

कांचनगरातील प्रमोद शेटे यांची पत्नी कांचन हिचा मंगळवारी सकाळी विष प्राशनामुळे मृत्यू झाला. यानंतर पती प्रमोद शेटके याने ही परिसरातील रेल्वे लाईनवर रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फेसबुक लाइव्ह सुद्धा केली .यात त्याने आपला चेहरा न दाखविता आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. आपली पत्नी या जगात नसल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने नमूद केले आहे.

फेसबुक लाईव्हद्वारे आईवडिलांना निरोप
प्रमोद शेटे याने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुक अकाऊंटवरून लाईव्ह केले. लाईव्ह करताना त्याने आपला चेहरा दाखविता आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. पत्नी या जगात नसल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने लाईव्ह व्हिडीओमध्ये म्हटले आहे. तसेच आईवडिलांसह कुटुंबियांचा निरोप घेत त्याने हे लाईव्ह केले आहे. यानंतर त्याने आत्महत्या केली. या प्रकाराने प्रचंड खळबळ उडाली असून परिवार सुन्न झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here