पिंपळगाव येथे रोटरी क्लब हिंगणघाट चे रक्तदान शिबीराचे आयोजन .

पिंपळगाव येथे रोटरी क्लब हिंगणघाट चे रक्तदान शिबीराचे आयोजन .

पिंपळगाव येथे रोटरी क्लब हिंगणघाट चे रक्तदान शिबीराचे आयोजन .

✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी:8806839078

हिंगणघाट:-नजिकच्या पिंपळगाव (माथनकर) येथे बिडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रिय सेवा योजनेच्या शिबिरात रोटरी क्लब च्या वतिने वैद्यकीय रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात गावातील २७ तरुणी तरुणांनी व विद्यार्थी विद्यार्थीनीनी रक्तदान केले.शहरी भागात नेहमी रक्तदान शिबीर होतात पण ग्रामिण भागात क्वचीतच रक्तदान शिबिर होतात,म्हनुण ड़ा अशोक मुखी, रोटरी क्लब हिंगनघाट चे अध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र केदार ,व एन एस एस प्रमुख राजेंद्र निखाडे यांनी पुढाकार घेऊन या शिबिराचे आयोजन केले.गावातील युवकांनीही उत्फर्त सहकार्य दिले ,वेगवेगळ्या आजाराच्या साथीमुळे जिल्ह्यात रक्ताची मोठ्याप्रमानात आवश्यक्ता आहे, त्यामुळे अशी शिबिर शहराप्रमाने गावातही होने गरजेचे आहे असे प्रतीपादन रोटरी अध्यक्ष प्रा.जितेंद्र केदार यांनी केले. आता पर्यंत ८१ वेळा रक्तदान केल्या बद्दल ड़ा अशोक मुखी यांचा व या वर्षी ४ रक्तदान शिबिर आयोजित करुण २०१ पिशवी रक्त जमा करुन दिल्या बद्दल रोटरी क्लब चे अध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र केदार यांचा ब्लड बैंक तर्फे. सत्कार करणयात आला .कार्यक्रमाचे संचालन प्रा.अशोक बोंगिरवार यांनी तर आभार प्रदर्शन रो.सचिव पुंडलिकराव बकाने यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सरपंच पुरुषोत्तम वराटकर प्रा.राजेंद्र निखाडे यांचे क्लबच्या वतीने स्वागत करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पराग कोचर , प्रा. रुपेश हिवरकर डाॅ.सतिश डांगरे, मुकुंद मुंदडा, मुरली लाहोटी, शुभंकरोती खांडरे, सो. डाँ रोमिला खांडरे यांनी सहकार्य केले.