जालना वालसावंगीत 14 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मुत्यू.

54

जालना वालसावंगीत 14 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मुत्यू.

जालना जिल्हा प्रतिनिधी

जालना:-  जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावातील 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या मुलाचं नाव अविनाश हिरालाल बोडखे असं आहे.

रविवारी सकाळी 9 वाजता वालसावंगी गाव शिवारातील नदीवर ही घटना घडली. अविनाश हा सकाळी घरून आईवडीलांना शेतात चाललो सांगून घरून निघाला होता. मात्र अविनाश हा शेताकडे न जाता रस्त्यावरील नदीत मित्रांसोबत पोहायला नदीत उतरला. तेव्हा नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला आणि बुडाला.

नदीवरील रस्त्यावरून काही मजूर शेताकडे कामानिमित्त जात असताना त्यांना अविनाशचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. ही बाब त्यांनी ग्रामस्थांच्या लक्षात आणूण दिली. त्यांनी दिलेली माहिती ऐकून गावकरी व आईवडिलांनी नदीकडे धाव घेतली.

मात्र, तोवर खूप उशीर झाला होता. अविनाश यांचा मुत्यू झाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. अविनाशच्या पश्चात आई- वडील एक भाऊ असा छोटा परिवार आहे अविनाशच्या जाण्यांने वालसावंगी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.